
Pune traffic Issue : पुणे शहराची वाढती लोकसंख्या आणि सुरु असलेली विकासकामे यामुळे वाहतूक कोंडी दिवसेंदिवस मोठी समस्या बनत आहे. पुण्यातील वाहतूक कोंडीच्या समस्येवर विधिमंडळात चर्चा झाली. पुणे शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. तसेच पुणे शहरात वाहतूक सुरळीत करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित वाहतूक सिग्नल प्रणाली विकसित करणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री (शहरे) योगेश कदम यांनी दिली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सदस्य चेतन तुपे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी सहभाग घेतला. ड्रंक अँड ड्राईव्ह संदर्भातील कायदा अधिक कडक केला जाणार असल्याचे सांगून राज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटलं की, या गुन्ह्यातील अपराध्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. अशा गुन्ह्यातील आरोपींची लवकर सुटका होऊ नये यासाठी कायद्यात सुधारणा केली जाईल.
(नक्की वाचा : Maharashtra Budget 2025 : कसा आहे राज्याचा अर्थसंकल्प? 5 मुद्यातून समजून घ्या संपूर्ण बजेट! )
दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी वाहतूक विभाग आणि पोलिस यंत्रणेचा समन्वय वाढवला जाईल. शहरातील वाहतूक नियमन, स्पीड ब्रेकर, अपघातप्रवण (ब्लॅक स्पॉट) ठिकाणांवर उपाययोजना व अपघात होत असलेल्या ठिकाणी स्पीड ब्रेकर, सिग्नल सिस्टिम आणि अन्य सुरक्षात्मक उपाय करण्यावर भर देण्यात येईल.
(नक्की वाचा- Maharashtra BJP : विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपाची यादी ठरली! अनुभवी नेत्याला पहिल्यांदाच संधी?)
पुणे शहरात वाहतूक व्यवस्थापनासाठी अतिरिक्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यासंदर्भातही निर्णय घेतला जाईल अशी माहिती दिली. राज्यमंत्री कदम म्हणाले, लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केलेली अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी असून. अशा घटना घडू नयेत म्हणून महापालिका व पोलिस यंत्रणेने आवश्यक उपाययोजना करण्यास प्राधान्य द्यावे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world