Pune News: सैन्यात अधिकारी बनण्याचं स्वप्न घेऊन NDA मध्ये आला, तरुणाने अवघ्या 3 महिन्यात संपवलं आयुष्य

Pune NDA News: अंतरिक्ष कुमार (वय 18 वर्ष) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून, तो मूळचा उत्तर प्रदेशमधील रहिवासी असल्याची माहिती आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

रेवती हिंगवे, पुणे

Pune News: पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) मध्ये शिक्षण घेणाऱ्या एका 18 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंतरिक्ष कुमार (वय 18 वर्ष) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून, तो मूळचा उत्तर प्रदेशमधील रहिवासी असल्याची माहिती आहे. आज पहाटे त्याने आपल्या खोलीत गळफास लावून आयुष्य संपवले.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज पहाटे अंतरिक्षने त्याच्या खोलीतील बेडशीटने गळफास लावून आत्महत्या केली. सकाळी ही घटना उघडकीस येताच एनडीए प्रशासनाने तात्काळ पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे. तसेच, अंतरिक्षच्या कुटुंबालाही या घटनेची माहिती देण्यात आली आहे.

(नक्की वाचा-  Pune News: पुण्यात सर्वात मोठी दहशतवादविरोधी कारवाई; कोथरूडच्या एका साध्या चोरीने दहशतवादी जाळे कसे उघड केले?)

जुलै महिन्यातच अंतरिक्ष कुमारने एनडीए (NDA) मध्ये प्रवेश घेतला होता. एनडीएसारख्या प्रतिष्ठित संस्थेत प्रवेश मिळवणे हे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. त्यामुळे या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलीस याचा सखोल तपास करत आहेत. अंतरिक्षने असे टोकाचे पाऊल का उचलले, याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. त्याच्या मित्रांची आणि संस्थेतील इतरांची चौकशी केली जाईल अशी शक्यता आहे.

या घटनेमुळे एनडीए कॅम्पसमध्ये शोककळा पसरली आहे. शिक्षण आणि करिअरच्या दबावामुळे विद्यार्थ्यांवर येणारा ताण हा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.

Advertisement

Topics mentioned in this article