3 hours ago
नवी दिल्ली:

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज NDTV वर्ल्ड समिट 2024 ची सुरुवात करतील. या शिखर संमेलनात एनडीटीव्ही वर्ल्ड देखील लॉन्च करण्यात येणार आहे. पीएम मोदी याबद्दल म्हणाले की, द इंडिया सेंचुरीवर NDTV World Summit मध्ये संबोधित करण्यासाठी उत्सुक आहेत. एनडीटीव्ही 21 आणि 22 ऑक्टोबर रोजी एनडीटीव्ही वर्ल्ड समिट 2024 - द इंडिया सेंचुरी (NDTV World Summit 2024 - The India Century) घेऊन आलं आहे. आज होणाऱ्या या समिटमध्ये जगभरातील बडे व्यक्तिमत्त्व उपस्थित राहणार आहेत. भूतानचे पीएम दाशो शेरिंग तोबगे, बारबाडोसचे पंतप्रधान मिया मोटली आणि ब्रिटनचे माजी पीएम लॉर्ड कॅमेरनदेखील उपस्थित राहतील. याशिवाय मोठे व्यावसायिक, चित्रपट आणि साहित्याशी संबंधित मोठे चेहरे एनडीटीव्ही वर्ल्ड समिटमध्ये सहभागी होतील.

Oct 21, 2024 11:08 (IST)

Live Update : भारताकडे दोन AI पॉवर आहेत - पीएम मोदी

जगाचं वर्तमान आणि भविष्य AIशी जोडलं गेलं आहे. भारताकडे दोन AI पॉवर आहेत. दुसरं Aspirational India म्हणजेच महत्त्वाकांक्षी भारत. Artificial Intelligence आणि Aspirational India ची ताकद एकत्र आल्यावर विकासाची गती वाढणे स्वाभाविक आहे. आमच्यासाठी AI फक्त एक तंत्रज्ञान नाही तर भारतातील तरुणांसाठी संधीची कवाडं आहेत. याच वर्षी भारताने इंडिया AI मिशन सुरू केलं आहे.

Oct 21, 2024 11:02 (IST)

Live Update : ...मात्र माणुसकी मेली असती, हे आमचे संस्कार नाहीत - नरेंद्र मोदी

आज जागतिक भविष्याला दिशा देण्यात भारताचा पुढाकार आहे. संकट काळात भारताची मदत होते, याचा जगाला विश्वास वाटतो. कोरोना काळात लसींमधून आपण कोट्यवधी कमावू शकलो असतो. याचा भारताला फायदाही झाला असता, मात्र माणुसकी मेली असती. हे आमचे संस्कार नाहीत. संकटात सापडलेल्या देशांना आपण जीवनरक्षक लस पोहोचवली, औषधं दिली. कठीण काळात भारत जगाच्या कामी येऊ शकला याचं मला समाधान आहे. 

Oct 21, 2024 10:53 (IST)

Live Update : भारताच्या प्रगतीचा जगाला फायदा होईल, भारताचे शतक हे संपूर्ण मानवतेच्या विजयाचे शतक ठरावे - मोदी

भारताच्या प्रगतीचा जगाला फायदा होईल, भारताचे शतक हे संपूर्ण मानवतेच्या विजयाचे शतक ठरावे. 

एक युग जे सगळ्यांच्या कौशल्याच्या आधारे मार्गक्रमण करेल. एक युग जे सगळ्यांच्या नावीन्यतेने समृद्ध असेल. एक असे युग जिथे गरिबी नसेल, एक असे युग असेल जिथे सगळ्यांना पुढे जाण्याची समान संधी असेल, एक असे युग ज्यात भारताच्या प्रयत्नांमुळे जगात स्थिरता आणि शांतता नांदेल.

Oct 21, 2024 10:32 (IST)

Live Update : आम्ही गरीबीचं आव्हान ओळखतो आणि प्रगतीसाठी मार्ग कसा शोधायचा हेदेखील जाणतो - मोदी

भारत एक विकसनशील देश आहे आणि उद्योन्मुखतेच्या वाटेवर आहे. आम्ही गरीबीचं आव्हान ओळखतो आणि प्रगतीसाठी मार्ग कसा शोधायचा हेदेखील जाणतो. भारत गतीने नीती तयार करतोय... निर्णय घेतोय... सुधारणा करतोय.

Advertisement
Oct 21, 2024 10:23 (IST)

Live Update : आजच्या दिवसाचं दोन्ही सभागृहांचं कामकाज तहकूब

पंतप्रधान मोदींनी मांडले 125 दिवसांचं प्रगतीपुस्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील सरकारला 125 दिवस पूर्ण झाले आहेत. NDTV वर्ल्ड समिटमध्ये बोलताना त्यांनी सरकारच्या 125 दिवसांच्या कामाचं प्रगतीपुस्तक मांडलं. 

3 कोटी पक्के घरांना मंजुरी

9 लाख कोटींच्या पायाभूत सुविधांवर काम सुरू

15 नवे वंदे भारत सुरू

8 नवे विमानतळांवर काम सुरू

तरुणांसाठी 2 लाख कोटींचं पॅकेज

शेतकऱ्यांसाठी 21 हजार कोटी ट्रान्सफर

5 लाख घरांमधील गच्चीवर सौर ऊर्जा पॅनल

Oct 21, 2024 10:19 (IST)

Live Update : जगभरात चिंतेचं वातावरण असताना भारत एक आशेचा किरण ठरला आहे - पीएम मोदी

सर्वांचं अभिनंदन, या समिटमध्ये आपण अनेक विषयांवर चर्चा करणार आहोत. विविध क्षेत्राशीसंबंधित जागतिक नेतेदेखील आपलं म्हणणं मांडतील. गेल्या काही वर्षाच्या काळात पाहिलं तर अधिकतर चर्चांमध्ये एक गोष्ट समान होती. ती म्हणजे चिंता... भविष्याबाबत चिंता.. कोरोनाकाळात जागतिक आजाराशी कसं लढायचं ही चिंता... कोरोनामुळे महागाईवर चिंता.. बेरोजगारीवर चिंता वाढली... जागतिक हवामानात बदल.. तणाव.. टेन्शन..जागतिक वाद यामुळेही चिंता निर्माण झाली आहे. हे जागतिक सेमिनारचे विषय ठरलेत. चर्चेंचा केंद्र चिंता असताना भारतात मात्र कशावर चर्चा होते? तर इंडियन सेंचुरी...भारत एक आशेचा किरण ठरला आहे. जग चिंतेत व्यस्त असताना भारत आशेचा संचार करीत आहे. 

Advertisement
Oct 21, 2024 10:08 (IST)

NDTV नेटवर्कचे मुख्य संपादक संजय पुगलिया यांच्याकडून संबोधन

Oct 21, 2024 10:02 (IST)

LIVE Update : NDTV वर्ल्ड समिटच्या कार्यक्रमाला सुरुवात

NDTV वर्ल्ड समिटच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली असून थोड्याच वेळात पीएम मोदी यांचं आगमन होईल. 

Advertisement
Oct 21, 2024 09:25 (IST)

Live Update : वर्ल्ड समिटच्या माध्यमातून जाणून घ्या दिग्गजांचे विचार

Oct 21, 2024 09:23 (IST)

Live Update : थोड्याच वेळात एनडीटीव्ही वर्ल्ड समिटला होणार सुरुवात..

Oct 21, 2024 08:47 (IST)

LIVE Update : NDTV समिटचा मंच सजला, अवघ्या काही वेळात कार्यक्रमाला सुरुवात

LIVE Update : NDTV समिटचा मंच सजला. अवघ्या काही वेळात कार्यक्रमाला सुरुवात होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते समिटचा शुभारंभ होईल.  

Oct 21, 2024 08:26 (IST)

Live Update : परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर NDTV World Summit 2024 - द इंडिया सेंचुरीमध्ये जागतिक मुद्द्यांवर आपली भूमिका मांडणार

परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर NDTV World Summit 2024 - द इंडिया सेंचुरीमध्ये जागतिक मुद्द्यांवर आपली भूमिका मांडणार.  समिटमध्ये अर्थशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेता आणि जागतिक बँकेचे माजी मुख्य अर्थशास्त्री प्रोफेसर पॉल रोमर, लेखक आणि इतिहासकार विलियम डेलरिम्पल सहभागी होतील. 

Oct 21, 2024 08:23 (IST)

Live Update : NDTV World Summit संबोधित करण्यासाठी उत्सुक - पंतप्रधान नरेंद्र मोदी