पंतप्रधान नरेंद्र मोदी आज NDTV वर्ल्ड समिट 2024 ची सुरुवात करतील. या शिखर संमेलनात एनडीटीव्ही वर्ल्ड देखील लॉन्च करण्यात येणार आहे. पीएम मोदी याबद्दल म्हणाले की, द इंडिया सेंचुरीवर NDTV World Summit मध्ये संबोधित करण्यासाठी उत्सुक आहेत. एनडीटीव्ही 21 आणि 22 ऑक्टोबर रोजी एनडीटीव्ही वर्ल्ड समिट 2024 - द इंडिया सेंचुरी (NDTV World Summit 2024 - The India Century) घेऊन आलं आहे. आज होणाऱ्या या समिटमध्ये जगभरातील बडे व्यक्तिमत्त्व उपस्थित राहणार आहेत. भूतानचे पीएम दाशो शेरिंग तोबगे, बारबाडोसचे पंतप्रधान मिया मोटली आणि ब्रिटनचे माजी पीएम लॉर्ड कॅमेरनदेखील उपस्थित राहतील. याशिवाय मोठे व्यावसायिक, चित्रपट आणि साहित्याशी संबंधित मोठे चेहरे एनडीटीव्ही वर्ल्ड समिटमध्ये सहभागी होतील.
वरळीत महायुतीत जागावाटपावरुन रस्सीखेच
वरळीत महायुतीत जागावाटपावरुन रस्सीखेच, वरळीत शायना एनसी यांना शिवसेनेकडून उमेदवारी चर्चा सुरू असताना स्थानिक शिवसेना माजी नगरसेवक दत्ता नरवणकर यांच्याशाळेसमोर कार्यकर्त्यांचं आंदोलन, वरळीत स्थानिक उमेदवार हवाय, बाहेरून उमेदवार नको, नरवणकर समर्थकांची मागणी
काँग्रेसची पहिली यादी 23 ॲाक्टोबरला जाहीर होणार, सूत्रांची माहिती
काँग्रेसची पहिली यादी 23 ॲाक्टोबरला जाहीर होणार, सूत्रांची माहिती
पहिल्या यादीत 50-55 उमेदवार असण्याची शक्यता
ज्या नावावर आजच्या बैठकीत चर्चा होईल, त्याच नावावर शिक्कामोर्तब होणार
उद्या पुन्हा सीईसी बैठक होण्याची शक्यता
वंचित बहुजन आघाडीची पाचवी यादी जाहीर
वंचित बहुजन आघाडीची पाचवी यादी आज जाहीर करण्यात आली आहे. अकोल्यात वंचित बहुजन आघाडी पाच विधानसभामधील एकमेव मूर्तीजापूर विधानसभेचा उमेदवार वंचितने जाहीर केला आहे. सूगत वाघमारे हे प्रसिद्ध उद्योजक आहेत व त्यांची पकड ही ग्रामीण भागात मजबूत आहे. वंचितचा पहिला उमेदवार आज पक्षाने जाहीर केल्याने मूर्तीजापुर विधानसभेत आनंदाचे कार्यकर्त्यांमध्ये वातावरण आहे.
'परिवर्तन महाशक्ती' महाराष्ट्र राज्य विधानसभा 2024 अधिकृत उमेदवारांची यादी
प्रहार पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील परिवर्तन महाशक्तीची विधानसभेची पहिली यादी जाहीर.
परिवर्तन महाशक्तीच्या पहिल्या यादीत आठ उमेदवारांचा समावेश.
परिवर्तन महाशक्ती आघाडीतर्फे बच्चू कडूंना अमरावतीच्या अचलपूर मतदार संघातून उमेदवारी.
विदर्भवादी ज्येष्ठ नेते तथा स्वातंत्र्य भारत पक्षाचे वामनराव चटप यांना राजुरा मतदार संघातून उमेदवारी.
मनसे नेते अविनाश जाधव आणि मनसे आमदार राजू पाटील यांना राज ठाकरेंकडून उमेदवारी जाहीर
मनसे नेते अविनाश जाधव आणि मनसे आमदार राजू पाटील यांना राज ठाकरेंकडून उमेदवारी जाहीर, दोघेही 24 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार
ठाणे जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का
ठाणे जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का
शिवसेना शिंदे गटाचे सहसंपर्कप्रमुख सुभाष पवार यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश
भाजपा आमदार किसन कथोरे यांना मुरबाड मतदारसंघात देणार आव्हान
पुण्यात 6 वेगवेगळ्या विमानात बॉम्ब ठेवल्याचं ट्वीट
विस्तारा एअरलाईन्सच्या 6 वेगवेगळ्या विमानात बॉम्ब ठेवण्यात येणार असल्याचं ट्वीट करत दहशत पसरवण्याचा प्रयत्न
पुण्यातील विमान नगर पोलीस स्टेशनमध्ये ट्वीट करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
स्किझोफेर्निया या एक्स अकाऊंटवरून अज्ञात इसमाने केले होते ट्वीट
6 वेगेवगळ्या विमानामध्ये 12 जण बॉम्ब ठेवणार असल्याची ट्वीटमधून देण्यात आली होती माहिती
विमानतळ पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरु
आरोपीने 6 विमानांचे नंबरही ट्वीटमध्ये टाकले होते आणि बॉम्ब ठेवण्यात येणार असल्याचे ट्वीट केले होते
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण, 4 आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण
आरोपी गुरमेल सिंह, धर्मराज कश्यप, प्रवीण लोणकर आणि हरीश कुमार निषाद कोर्टात हजर
25 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी
महायुतीत जोगेश्वरी मतदारसंघावरून टोकाचा वाद
महायुतीत जोगेश्वरी मतदारसंघावरून टोकाचा वाद असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भाजपच्या माजी नगरसेविका उज्ज्वला मोडक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला. खासदार रविंद्र वायकर यांच्या जोगेश्वरी विधानसभेतुन लढण्यासाठी मोडक इच्छुक. रविंद्र वायकर मात्र स्वतःच्या पत्नीसाठी आग्रही.वायकर यांच्या पत्नीला तिकिट दिल्यास भाजपचे पदाधिकारी राजीनामा देण्याची शक्यता
Live Update : 2030 पर्यंत भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थसत्ता बनलेला असेल- एस जयशंकर
2030 पर्यंत भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थसत्ता बनलेला असेल- एस जयशंकर
केंद्रीय परराष्ट्रमंत्र्यांची मुलाखत सुरु
NDTV वर्ल्ड सबमिटमध्ये केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर मुलाखत सुरु झाली आहे.
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर करणार संबोधन
नवी दिल्लीमध्ये सुरु असलेल्या NDTV वर्ल्ड सबमिटमध्ये केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर थोड्याच वेळात संबोधन करणार आहेत.
Live Update : महायुतीला आणखी एक मोठा धक्का
महायुतीला आणखी एक मोठा धक्का
कुणबी सेनेचा भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला दिलेला पाठिंबा स्थगित केला आहे. कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी याबाबत माहिती दिली. गेल्या आठ वर्षांपासून कुणबी सेना महायुतीसोबत सहयोगी संघटना म्हणून कार्यरत होती. सर्व राजकीय पक्षांनी आमचा उपयोग कढीपत्त्यासारखा केला, पेसा कायद्यामुळे आमचं आरक्षण शून्य टक्क्यावर आणलं. जरांगेंच्या ब्लॅकमेलिंगला घाबरून सरकार त्याच्यासमोर नतमस्तक होतं, आणि त्यांच्या कुठल्याही मागण्या मान्य करते, असं म्हणत कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी सरकारला खडे बोल सुनावले.
मविआमधील फुटीच्या वृत्तावर महाविकास आघाडीतील नेत्यांनी मांडली बाजू...
काँग्रेस-ठाकरे गट स्वतंत्र लढणार असल्याचे वृत्त विजय वडेट्टीवारांनी फेटाळले, बातम्या जाणीवपूर्वक पेरल्या जात असल्याचा आरोप. त्यानंतर संजय राऊत यांनीही अशा बातम्या पेरणं म्हणजे पतंगबाजी असल्याचा दावा केला आहे.
ही सरळ सरळ पतंगबाजी आहे.
— Sanjay Raut (@rautsanjay61) October 21, 2024
दुसऱ्या भाषेत मोठी सुपारी असेही म्हणता येईल! pic.twitter.com/z5d8DLbuKG
कल्याण : भाजपकडून सुलभा गायकवाड यांना उमेदवारी दिल्यानंतर शिवसेना शिंदे गटात अस्वस्थता
कल्याण पूर्व मतदारसंघात भाजपकडून सुलभा गायकवाड यांना उमेदवारी दिल्यानंतर शिवसेना शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे. कल्याण पूर्वेतील शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषद घेणार असून पत्रकार परिषदेत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटाकडून बंडखोरीची शक्यता आहे. ते काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
Live Update : भारताकडे दोन AI पॉवर आहेत - पीएम मोदी
जगाचं वर्तमान आणि भविष्य AIशी जोडलं गेलं आहे. भारताकडे दोन AI पॉवर आहेत. दुसरं Aspirational India म्हणजेच महत्त्वाकांक्षी भारत. Artificial Intelligence आणि Aspirational India ची ताकद एकत्र आल्यावर विकासाची गती वाढणे स्वाभाविक आहे. आमच्यासाठी AI फक्त एक तंत्रज्ञान नाही तर भारतातील तरुणांसाठी संधीची कवाडं आहेत. याच वर्षी भारताने इंडिया AI मिशन सुरू केलं आहे.
Live Update : ...मात्र माणुसकी मेली असती, हे आमचे संस्कार नाहीत - नरेंद्र मोदी
आज जागतिक भविष्याला दिशा देण्यात भारताचा पुढाकार आहे. संकट काळात भारताची मदत होते, याचा जगाला विश्वास वाटतो. कोरोना काळात लसींमधून आपण कोट्यवधी कमावू शकलो असतो. याचा भारताला फायदाही झाला असता, मात्र माणुसकी मेली असती. हे आमचे संस्कार नाहीत. संकटात सापडलेल्या देशांना आपण जीवनरक्षक लस पोहोचवली, औषधं दिली. कठीण काळात भारत जगाच्या कामी येऊ शकला याचं मला समाधान आहे.
Live Update : भारताच्या प्रगतीचा जगाला फायदा होईल, भारताचे शतक हे संपूर्ण मानवतेच्या विजयाचे शतक ठरावे - मोदी
भारताच्या प्रगतीचा जगाला फायदा होईल, भारताचे शतक हे संपूर्ण मानवतेच्या विजयाचे शतक ठरावे.
एक युग जे सगळ्यांच्या कौशल्याच्या आधारे मार्गक्रमण करेल. एक युग जे सगळ्यांच्या नावीन्यतेने समृद्ध असेल. एक असे युग जिथे गरिबी नसेल, एक असे युग असेल जिथे सगळ्यांना पुढे जाण्याची समान संधी असेल, एक असे युग ज्यात भारताच्या प्रयत्नांमुळे जगात स्थिरता आणि शांतता नांदेल.
Live Update : आम्ही गरीबीचं आव्हान ओळखतो आणि प्रगतीसाठी मार्ग कसा शोधायचा हेदेखील जाणतो - मोदी
भारत एक विकसनशील देश आहे आणि उद्योन्मुखतेच्या वाटेवर आहे. आम्ही गरीबीचं आव्हान ओळखतो आणि प्रगतीसाठी मार्ग कसा शोधायचा हेदेखील जाणतो. भारत गतीने नीती तयार करतोय... निर्णय घेतोय... सुधारणा करतोय.
Live Update : आजच्या दिवसाचं दोन्ही सभागृहांचं कामकाज तहकूब
पंतप्रधान मोदींनी मांडले 125 दिवसांचं प्रगतीपुस्तक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील सरकारला 125 दिवस पूर्ण झाले आहेत. NDTV वर्ल्ड समिटमध्ये बोलताना त्यांनी सरकारच्या 125 दिवसांच्या कामाचं प्रगतीपुस्तक मांडलं.
3 कोटी पक्के घरांना मंजुरी
9 लाख कोटींच्या पायाभूत सुविधांवर काम सुरू
15 नवे वंदे भारत सुरू
8 नवे विमानतळांवर काम सुरू
तरुणांसाठी 2 लाख कोटींचं पॅकेज
शेतकऱ्यांसाठी 21 हजार कोटी ट्रान्सफर
5 लाख घरांमधील गच्चीवर सौर ऊर्जा पॅनल
Live Update : जगभरात चिंतेचं वातावरण असताना भारत एक आशेचा किरण ठरला आहे - पीएम मोदी
सर्वांचं अभिनंदन, या समिटमध्ये आपण अनेक विषयांवर चर्चा करणार आहोत. विविध क्षेत्राशीसंबंधित जागतिक नेतेदेखील आपलं म्हणणं मांडतील. गेल्या काही वर्षाच्या काळात पाहिलं तर अधिकतर चर्चांमध्ये एक गोष्ट समान होती. ती म्हणजे चिंता... भविष्याबाबत चिंता.. कोरोनाकाळात जागतिक आजाराशी कसं लढायचं ही चिंता... कोरोनामुळे महागाईवर चिंता.. बेरोजगारीवर चिंता वाढली... जागतिक हवामानात बदल.. तणाव.. टेन्शन..जागतिक वाद यामुळेही चिंता निर्माण झाली आहे. हे जागतिक सेमिनारचे विषय ठरलेत. चर्चेंचा केंद्र चिंता असताना भारतात मात्र कशावर चर्चा होते? तर इंडियन सेंचुरी...भारत एक आशेचा किरण ठरला आहे. जग चिंतेत व्यस्त असताना भारत आशेचा संचार करीत आहे.
NDTV नेटवर्कचे मुख्य संपादक संजय पुगलिया यांच्याकडून संबोधन
LIVE Update : NDTV वर्ल्ड समिटच्या कार्यक्रमाला सुरुवात
NDTV वर्ल्ड समिटच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली असून थोड्याच वेळात पीएम मोदी यांचं आगमन होईल.
Live Update : वर्ल्ड समिटच्या माध्यमातून जाणून घ्या दिग्गजांचे विचार
Live Update : थोड्याच वेळात एनडीटीव्ही वर्ल्ड समिटला होणार सुरुवात..
The inaugural #NDTVWorldSummit sets the stage for exploring 'The India Century' and its global impact with some of the biggest names shaping the future.
— NDTV (@ndtv) October 21, 2024
Stay tuned to NDTV Network with NDTV's @sanjaypugalia to watch more! pic.twitter.com/ppLshsa8aT
LIVE Update : NDTV समिटचा मंच सजला, अवघ्या काही वेळात कार्यक्रमाला सुरुवात
LIVE Update : NDTV समिटचा मंच सजला. अवघ्या काही वेळात कार्यक्रमाला सुरुवात होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते समिटचा शुभारंभ होईल.
Live Update : परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर NDTV World Summit 2024 - द इंडिया सेंचुरीमध्ये जागतिक मुद्द्यांवर आपली भूमिका मांडणार
परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर NDTV World Summit 2024 - द इंडिया सेंचुरीमध्ये जागतिक मुद्द्यांवर आपली भूमिका मांडणार. समिटमध्ये अर्थशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेता आणि जागतिक बँकेचे माजी मुख्य अर्थशास्त्री प्रोफेसर पॉल रोमर, लेखक आणि इतिहासकार विलियम डेलरिम्पल सहभागी होतील.
Live Update : NDTV World Summit संबोधित करण्यासाठी उत्सुक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
At 10 AM tomorrow morning, I look forward to addressing the #NDTVWorldSummit on ‘The India Century.’ India’s growth trajectory has truly captured global attention. Our Yuva Shakti is taking our nation to new heights. I will be talking about India’s key strides and why we remain a…
— Narendra Modi (@narendramodi) October 20, 2024