जाहिरात

NEET Paper Leak : सीबीआयच्या रडारवर आता कल्याणची विद्यार्थिनी; 'तो' मोबाईल नंबर ठरला तपासाचा मुख्य धागा

NEET Paper Leak : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या 'नीट' पेपर लीक प्रकरणाची पाळेमुळे आता थेट कल्याणपर्यंत पोहोचली आहेत

NEET Paper Leak :  सीबीआयच्या रडारवर आता कल्याणची विद्यार्थिनी; 'तो' मोबाईल नंबर ठरला तपासाचा मुख्य धागा
NEET Paper Leak : या कारवाईची कल्याणमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे.
कल्याण:

NEET Paper Leak : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या 'नीट' पेपर लीक प्रकरणाची पाळेमुळे आता थेट कल्याणपर्यंत पोहोचली आहेत. हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लावणाऱ्या या महाघोटाळ्याचा तपास करत असताना देशातील सर्वात मोठ्या केंद्रीय तपास यंत्रणेनेनं कल्याणमधील एका विद्यार्थीनीची चौकशी केली आहे.  संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या या प्रकरणाचं कल्याण कनेक्शन समोर आल्यानं नवे खुलासे होण्याची शक्यता आहे. या कारवाईची कल्याणमध्ये जोरदार चर्चा सुरु असून या विद्यार्थिनीची नेमकी काय भूमिका आहे, यावर आता चर्चा रंगू लागल्या आहेत.

काय आहे प्रकरण?

हा संपूर्ण धक्कादायक प्रकार नीट पेपर फुटी प्रकरणाच्या तपासादरम्यान कल्याण जवळील म्हाराळ परिसरात घडला आहे. नीट परीक्षा घोटाळ्याचा तपास करणाऱ्या सीबीआयच्या विशेष पथकाने थेट कल्याणमधील म्हाराळ परिसरात एका विद्यार्थिनीच्या घरावर धडक दिली. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी या विद्यार्थिनीचा जबाब नोंदवला असल्याची अत्यंत विश्वासू माहिती समोर आली आहे. 

या महाघोटाळ्यात आतापर्यंत अनेक राज्यांमध्ये धागेदोरे सापडले असतानाच, सीबीआयची थेट कल्याणमध्ये एन्ट्री झाल्याने प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.

या नीट पेपर फुटी प्रकरणात आणि एकूणच या संशयास्पद व्यवहारात या विद्यार्थिनीची किंवा तिच्या कुटुंबातील सदस्यांची नेमकी काय भूमिका आहे, हे अद्याप अधिकृतपणे समोर आलेले नाही. मात्र, सीबीआयच्या पथकाने थेट घरात येऊन चौकशी केल्याने स्थानिक परिसरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

( नक्की वाचा : Akola News: NEET पेपरफुटीचे धागेदोरे अकोल्यात; आरसीसीच्या शिक्षकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात )
 

मोबाईल नंबरमुळे सीबीआय थेट घरात

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनी एका दुसऱ्या विद्यार्थ्याच्या सतत संपर्कात होती, जो आधीपासूनच तपास यंत्रणांच्या रडारवर आहे. सीबीआयने जेव्हा त्या संशयास्पद विद्यार्थ्याच्या कॉल डिटेल्सची आणि संपर्काची तपासणी केली, तेव्हा या कल्याणमधील विद्यार्थिनीचा मोबाईल नंबर तपास यंत्रणेच्या हाती लागला. याच संशयास्पद कनेक्शनचा धागा पकडून सीबीआयने थेट कल्याण गाठले आणि या मुलीची कसून विचारपूस केली.

या संपूर्ण कारवाईबाबत संबंधित विद्यार्थिनीच्या वडिलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी अधिक बोलण्यास स्पष्ट नकार दिला. माझी मुलगी एका दुसऱ्या विद्यार्थ्याच्या संपर्कात होती आणि त्यामुळेच तिचा मोबाईल नंबर तपास यंत्रणेकडे गेला होता, असे तिच्या वडिलांनी सांगितले. 

Latest and Breaking News on NDTV

याच अनुषंगाने सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी घरी येऊन केवळ प्राथमिक विचारपूस केली आहे, असे सांगत त्यांनी यापेक्षा अधिक माहिती देण्यास नकार दिला. या विद्यार्थिनीचा केवळ संवाद होता की या पेपर फुटीच्या मोठ्या रॅकेटमध्ये तिचा काही सहभाग आहे, याचा शोध आता सीबीआय घेत आहे.

( नक्की वाचा : NEET Paper Leak: 'नीट'मध्ये कोऱ्या उत्तरपत्रिकेचा खेळ? उत्तरं भरण्यासाठी 20 लाखांचा रेट, वाचा कसं चालतं रॅकेट )

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com