जाहिरात

Pune News पुणे ते संभाजीनगर आता फक्त सव्वा दोन तासात! नितीन गडकरींचा मास्टरस्ट्रोक, 5 बड्या प्रकल्पांना मंजुरी

Pune News :  पुणे विभागातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि दळणवळण अधिक वेगवान करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे.

Pune News पुणे ते संभाजीनगर आता फक्त सव्वा दोन तासात! नितीन गडकरींचा मास्टरस्ट्रोक, 5 बड्या प्रकल्पांना मंजुरी
Pune News : या नवीन विकास आराखड्यानुसार अनेक महत्त्वाचे कॉरिडॉर विकसित केले जाणार आहेत.
पुणे:

यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी

Pune News :  पुणे विभागातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि दळणवळण अधिक वेगवान करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. पुणे विभागासाठी तब्बल 50,000 कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून, यामुळे भविष्यात पुण्याचा चेहरामोहरा बदलणार आहे. 

या प्रकल्पांच्या माध्यमातून पुणे शहर वाहतूक कोंडीमुक्त आणि प्रदूषणमुक्त करण्याचा सरकारचा मानस आहे. गुरुवारी झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत या पाच प्रमुख प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले, ज्यामध्ये रस्ते विकासाचा सविस्तर आराखडा मांडण्यात आला आहे.

काय आहेत नवीन प्रकल्प?

या नवीन विकास आराखड्यानुसार अनेक महत्त्वाचे कॉरिडॉर विकसित केले जाणार आहेत. यामध्ये पुणे ते शिरूर हा 54 किलोमीटरचा कॉरिडॉर अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून त्यासाठी 7,515 कोटी रुपये खर्च केले जातील. तसेच तळेगाव-चाकण-शिक्रापूर या 53 किलोमीटरच्या मार्गासाठी 4,000 कोटी रुपयांची निविदा निश्चित करण्यात आली आहे. 

पुणे-सोलापूर मार्गावरील हडपसर ते यवत या 31 किलोमीटरच्या अंतरासाठी देखील तरतूद करण्यात आली आहे. नाशिक फाटा ते खेड या मार्गासाठी 7,808 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून दुसऱ्या एका प्रकल्पासाठी 5,000 कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली आहे. हे सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे ते छत्रपती संभाजीनगर हे अंतर केवळ सव्वा दोन तासात पार करणे शक्य होईल.

( नक्की वाचा : Maharashtra Budget 2026: पुणे मेट्रो आता सासवड, वाघोलीच्या दारात; बजेटमध्ये पुण्याच्या पायाभूत सुविधांचा धमाका )
 

राज्य सरकारला आवाहन

पुणे शहरातील वाहतुकीची समस्या अत्यंत गंभीर झाली असून ती सोडवण्यासाठी नितीन गडकरी यांनी राज्य सरकारकडे काही विशेष मागण्या केल्या आहेत. या सहा मोठ्या प्रकल्पांसाठी लागणारी वाळू आणि दगड यांसारख्या साहित्यावरील किंमती किंवा रॉयल्टी माफ करावी, अशी सूचना त्यांनी राज्य सरकारला केली आहे. यामुळे प्रकल्पाचा खर्च मर्यादित राहण्यास मदत होईल. 

या बैठकीत कोल्हापूर परिसरातील रस्त्यांच्या कामांबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली असून तेथील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

( नक्की वाचा : Pune News: मंचरमध्ये पुन्हा धार्मिक वादाची ठिणगी! मशिदीखाली भुयार सापडल्याच्या चर्चेनंतर आता बारवेवर रणकंदन )

मुंबई ते बंगलोर नवीन महामार्ग आणि रिंगरोड

वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी मुंबई ते बंगलोर असा एक नवीन महामार्ग बांधला जाणार आहे. हा मार्ग जेएनपीटी (JNPT) बंदराजवळून सुरू होऊन पुण्यातून पुढे जाईल, ज्यामुळे मालवाहतूक आणि प्रवाशांचा वेळ मोठ्या प्रमाणावर वाचणार आहे. दरम्यान, पुणे शहरातील रिंगरोडचे काम राज्य सरकारमार्फत केले जात आहे. 

कात्रज उड्डाणपुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून ते लवकरच पूर्ण होईल. याशिवाय पुणे-सातारा रस्त्यासाठी 6,000 कोटी रुपयांचा डीपीआर (DPR) तयार करण्यात येणार असून जुन्या पुणे-मुंबई हायवेच्या नूतनीकरणावरही भर दिला जाणार आहे.

पालखी मार्गाचे उद्घाटन आणि परीक्षण

वारकरी संप्रदायासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पालखी मार्गाचे काम आता जवळपास पूर्ण झाले आहे. नितीन गडकरी यांनी माहिती दिली की, पुढच्या महिन्यात ते स्वतः या पालखी मार्गाचे परीक्षण करणार आहेत. ते देहू ते पंढरपूर आणि आळंदी ते पंढरपूर या मार्गाची पाहणी करतील. या मार्गाचे औपचारिक उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. येत्या पुढच्या महिन्यात पुणे विभागातील अनेक मोठ्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन पार पडणार असून यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील रस्ते जाळे अधिक मजबूत होणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com