प्रांजल कुलकर्णी, नाशिक
Nashik News : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. माणिकराव कोकाटे यांच्यासह नाशिक जिल्हा बँकेच्या 25 माजी संचालकांना बँकेकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. 25 पैकी अनेक जण नाशिक जिल्ह्यातील विविध पक्षाचे बडे राजकीय नेते आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
खासदार शोभा बच्छाव, आमदार दिलीप बनकर, आमदार नरेंद्र दराडे, आमदार राहुल ढिकले, आमदार डॉक्टर राहुल आहेर या सर्वांना नोटीस बजावण्यात आली आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 347 कोटींच्या कर्ज वाटपात 182 कोटींची अनियमितता आढळल्याचं हे प्रकरण आहे.
(नक्की वाचा- पुणे-नाशिक अंतर 2 तासांनी कमी होणार? सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच सुरू होणार)
कलम 88 अंतर्गत अडीच वर्षाची चौकशी केल्यानंतर संशयास्पद कर्ज वितरित केल्याप्रकरणी 15 अधिकारीही अडचणीत आले आहेत. येत्या 2 एप्रिलला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासमोर सुनावणी होणार असून सर्वांना हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
(नक्की वाचा- Crime News : प्रशांत कोरटकर दुबईत की तपास भरकटवण्याचा प्रयत्न? जुन्या इन्स्टा पोस्टमुळे संशय बळावला)
कुणावर किती ठपका?
- कृषीमंत्री, सिन्नर मतदारसंघाचे आमदार माणिकराव कोकाटे - 1.87 कोटी
- काँग्रेसच्या धुळे - मालेगाव मतदारसंघाच्या खासदार शोभा बच्छाव - 2.11 कोटी
- अजित पवार गटाचे निफाड मतदारसंघाचे आमदार दिलीप बनकर - 8.65 कोटी
- भाजपचे नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले - 8.76 कोटी
- भाजपचे चांदवड मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल आहेर - 43 लाख
- ठाकरे गटाचे माजी आमदार नरेंद्र दराडे - 8.89 कोटी
- अजित पवार गटाचे माजी खासदार देवीदास पिंगळे - 8.65 कोटी
- ठाकरे गटाचे माजी आमदार वसंत गिते - 1.89 कोटी
- माकपचे माजी आमदार जे. पी. गावित 7.21 कोटी
- काँग्रेसचे माजी आमदार शिरीष कोतवाल - 1.98 कोटी
- शरद पवार गटाचे पदाधिकारी माणिकराव शिंदे - 67 लाख
- अजित पवार गटाचे पदाधिकारी संदीप गुळवे 7.57 कोटी
- ठाकरे गटाचे पदाधिकारी दत्ता गायकवाड - 67 लाख
- राजेंद्र भोसले - 8.78 कोटी
- राघो अहिरे - 8.89 कोटी
- सुचेता बच्छाव - 2.11 कोटी
- चंद्रकांत गोगड - 1.32 कोटी
- नानासाहेब पाटील - 8.78 कोटी
- राजेंद्र डोखळे - 8.89 कोटी
- माणिकराव बोरस्ते - 7.02 कोटी
- धनंजय पवार - 7.57 कोटी
- वैशाली कदम - 8.54 कोटी
- गणपतराव पाटील- 8.89 कोटी