अमजद खान
कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात मनसेची शाखा आहे. शाखा ज्या ठिकाणी आहे, त्याठिकाणी अनधिकृत शेड उभारण्यात आली आहे. ही शेड अनधिकृत असल्याचा महापालिकेचा दावा आहे. त्यामुळे या ठिकाणी कारवाई करण्याचे कल्याण महापालिकेने निश्चित केले होते. त्यानुसार कारवाई करण्यासाठी महापालिकेचे पथक त्या ठिकाणी धडकले. पण कारवाई करण्याचे राहीले बाजूलाच महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आल्या पावलीच परतावे लागले. याची जोरदार चर्चा सध्या कल्याण डोंबिवलीत होत आहे. कारवाई न करताच महापालिकेचे अधिकारी का परतले अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मनसेच्या शाखेबाहेर असलेल्या अनधिकृत शेडवर कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त सविता हिले या आपल्या पथकासह गेल्या. शेड पाडली जाणार होती. त्यामुळे जेसीबीही बरोबरच होता. कारवाईसाठी महापालिकेचे पथक आलं आहे हे पाहून मनसेचे कार्यकर्ते त्या ठिकाणी जमा झाले. त्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घातला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. काय करावे काय नाही हे अधिकाऱ्यांना त्यावेळी समजलेच नाही. त्यात कार्यकर्तेहे आक्रमक झाले होते.
याच शाखेच्या बाजूला अनधिकृत ढाबा, टॉवर आहेत. ते महापालिकेला दिसत नाहीत का? असा प्रश्न मनसे कार्यकर्त्यांनी यावेळी केला. तुम्हाल केवळ मनसेची शाखा दिसते का? अशी विचारणाही त्यांनी केली. मनसे कार्यकर्ते यावेळी आक्रमक होते. त्यामुळे अडचण निर्माण झाली असती. अशा वेळी कोणतीही कारवाई न करता परतण्याचा निर्णय सहाय्यक आयुक्त सविता हिले यांनी घेतला. त्यांनी कोणतीही कारवाई शाखेवर किंवा अनधिकृत शेडवर केली नाही. मात्र येणाऱ्या काही दिवसात ही कारवाई केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. आम्ही शाखेवर कारवाई करीत नाही. त्याठिकाणी अनधिकृत शेड उभारली आहे. त्यावर कारवाई करणार आहोत असे सहाय्यक आयुक्त सविता हिले यांनी स्पष्ट केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world