Malegaon News : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तावर हल्लाबोल करत दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला चढवला. त्यानंतर दोन्ही देशांमधील संघर्ष टोकाला पोहोचला होता. मात्र भारताच्या कारवाईने पाकिस्तानचं अक्षरश: कंबरडं मोडलं आणि अखेर पाकिस्तानने माघार घेतल्याने शस्त्रसंधी लागू करण्यात आली. देशात एकीकडे हे होत असताना गुप्तचर यंत्रणा देशातील बारीक-सारीक हालचालींकडे बारकाईने लक्ष देऊन होत्या. अशातच एटीएसने मालेगावात संशयास्पद हालचालींच्या पार्श्वभूमीवर कारवाई करत एका तरुणाला ताब्यात घेतलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नाशिकच्या मालेगावमध्ये युद्ध काळात पाकिस्तानच्या वेबसाईट सर्च केल्याच्या संशयावरून दहशतवादी विरोधी पथकाने 45 वर्षीय यंत्रमाग मालक असलेल्या व्यक्तीला ताब्यात घेतलं. पाकिस्तानी वेबसाईट सर्च करण्यामागचा त्याचा हेतू काय आहे याची तपासणी करण्यासाठी एनआयएने ही कारवाई केली आहे.
(नक्की वाचा - India vs Pakistan : भारताची पंगा घेऊन पाकिस्तानवर कर्ज घेऊनही भीक मागायची वेळ! किती झालं नुकसान?)
एनआयएला संशय आल्याने या व्यक्तीची सुमारे 6 तासांपेक्षा जास्त कसून चौकशी करण्यात आली. सायबर सेल दिलेल्या माहितीवरून दहशतवादी विरोधी पथकाचा एक अधिकारी व तीन कर्मचारी मालेगावमध्ये तळ ठोकून होते.आझादनगर गुरुवार वॉर्ड भागात या तरुणाला पथकाने ताब्यात घेत त्याचा मोबाईल हस्तगत केला.
( नक्की वाचा : Video : 'पराभवानंतरही ढोल वाजवण्याची पाकिस्तानची जुनी खोड, POK रिकामं करा', भारतानं ठणकावलं )
या व्यक्तीने आणखी कोणाशी संपर्क आहेत का? किंवा पाकिस्तानमधील आणखी कोणाशी संपर्क केला का? याचा शोध घेतला जात आहे. दहशतवादी विरोधी पथकाने केलेल्या कारवाईने मालेगावात खळबळ उडाली आहे.