
जुई जाधव, प्रतिनिधी
Diwali Shopping Online Or Offline : पावसाचा जोर कमी झाला असून अनेक ठिकाणी उन्हाच्या झळा पसरू लागल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून पावसाने उसंती घेतली असल्याने सर्वांनाच आता दिवाळीच्या सण उत्साहात साजरा करण्याचे वेध लागले आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत दिवाळी सण सुरु होणार असून अनेक जण शॉपिंगमध्ये व्यस्त झाले आहेत. पण याच दिवाळी सणात मार्केटमध्ये खरेदी कशी करावी? ऑनलाईन की ऑफलाईन? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. पण ग्राहकांनो टेन्शन अजिबात घेऊ नका..कारण आम्ही तुम्हाला स्वस्त खरेदीबाबत माहिती देणार आहोत. पण ती खरेदी ऑनलाईन करायची की ऑफलाईन? याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
दिवाळी खरेदीबाबत या गोष्टी माहितीयत का?
आकाशकंदील दिवाशी सणात महत्त्वाचा दिवाच असतो. आजकाल कंदीलांमध्ये ही विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतात.पैठणी पासून कंदील बनवला जातो. फोल्डिंगचाही कंदील बनवला जातो. तसच छोटे कंदील बनवले जातात. विविध रंगांचे आकारांचे कंदील बनवले जातात. हेच कंदील ऑनलाईन 250 ते 500 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. पण ते कंदीत फोल्डिंगमध्ये दिले आहेत. त्यामुळे तुम्ही ते पुढच्या वर्षीही वापरू शकता.
आपण जर ऑफलाइन पद्धतीने म्हणजेच बाजारात जाऊन कंदील विकत घेतला, तर त्याचीही किंमत पाचशे रुपयांपासून सुरु होते. पण थोडीफार बार्गेनिंग करून हे कंदिल चारशे रुपयांपर्यंत विकत घेऊ शकता.
नक्की वाचा >> रणवीर सिंग की दीपिका पादुकोण? कोण आहे सर्वात जास्त श्रीमंत? Net worth चा आकडा वाचून डोळे विस्फारतील
दिवाळी म्हटलं की घराघरात फराळ बनवला जातो. काही महिला कामावर जातात आणि त्यामुळे काही महिलांना घरी फराळ करणं शक्य नसतं. अशा महिलांसाठीही घरगुती फराळ हा बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.आपण ऑनलाईनही फराळ विकत घेऊ शकतो,परंतु ऑनलाईन फराळाची किंमत ही हजार रुपयांनी सुरुवात होते. ज्यामध्ये चकली चिवडा लाडू या सगळ्याचा समावेश आहे. जर तुम्ही मार्केटमध्ये जाऊन फराळ विकत घेत असाल, तर तीनशे रुपयांपासून या फराळाच्या किमतीला सुरुवात होते. त्यामुळे निश्चितच ऑफलाईन पद्धत इथे उपयुक्त ठरू शकते.
कंदील झाला..फराळ झाला..आता रांगोळीचं काय? दारापुढे भली मोठी रांगोळी काढल्याने आपल्या घराची शोभा वाढते. मात्र हीच रांगोळी जर तुम्ही दुकानात विकत घेत असाल, तर दहा रुपयापासून ही रांगाळी मिळते. हीच रांगोळी ऑनलाईन विकत घेतली तर दीडशे रुपयाला मिळते.तसच दिवाळीला संपूर्ण घरात दिवे लावून आपण परिसर प्रकाशमय करतो. याच पणत्या दुकानात आपल्याला 50 रुपये जोडीने मिळतात. काही पणत्या शंभर रुपयांनाही मिळतात. पण त्याच पणत्या तुम्हाला ऑनलाईन अडीशे आणि तीनशे रुपयांना मिळतील.
नक्की वाचा >> कुटुंबीयांचा प्रचंड विरोध, तरीही मुस्लीम मुलीनं हिंदू मुलासोबत संसार थाटला, नंतर जे घडलं..थेट Video शेअर केला
दिवाळी म्हटलं की फटाक्यांची आतषबाजी होणारच. लहान मुलं असो किंवा अबालवृद्ध फटकांशिवाय ते दिवाळी साजरीच करत नाहीत. अनेक दुकानदार फटाके ऑनलाईन विकत नाहीत. कारण फटाक्यांच्या शॉपचा एक परवाना असतो. जर तुमच्याकडे फटाके विकण्याचा परवाना असेल तरच तुम्ही फटाके विकत घेऊ शकता. फटाक्यांची किंमतही 100 रुपयांनी सुरु होते. तसच 250 ते 300 रुपयांपर्यंतही फटाके मिळतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world