
Mumbai high court recruitment 2025: मुंबई उच्च न्यायालयाने पर्सनल असिस्टंट (PA) पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 18 ऑगस्ट 2025 पासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार bombayhighcourt.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. या पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि पगार याबद्दलची माहिती खालीलप्रमाणे आहे. जे पात्र उमेदवार आहेत त्यांनी नक्कीच या पदासाठी अर्ज करावा. त्यामुळे जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.
शैक्षणिक पात्रता:
या पदासाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. ज्या उमेदवारांकडे कायद्याची पदवी (Law degree) असेल, त्यांना प्राधान्य दिले जाईल. तसेच, उमेदवाराला उच्च न्यायालयात 8 ते 10 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा:
उमेदवाराचे वय कमीत कमी २१ वर्षे आणि जास्तीत जास्त ३८ वर्षे असावे. आरक्षित वर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
पगार:
या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 67,700 ते 2,08,700 रुपये पगार दिला जाईल.
निवड प्रक्रिया:
उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या (Interview) आधारे केली जाईल.
अर्ज शुल्क:
या पदासाठी अर्ज शुल्क 1000 रुपये आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे महत्त्वाचे आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world