डॉ. विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. नागपूरचे असलेले डॉ. विलास डांगरे हे गेल्या 50 वर्षापासून अविरत पणे रुग्णांची सेवा करत आहेत. होमिओपॅथिक क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. रुग्णांना अतिशय माफक दरात ते रुग्ण सेवा देत होते. त्यांनी अटल बिहारी वाजपेयींपासून बाळासाहेब ठाकरे सारख्या दिग्गजांना आपली सेवा दिली आहे. निवडणूक प्रचार काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गळा बसला होता. त्यावर ही डॉ. डांगरे यांनी उपचार केले होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नागपूरच्या जयप्रकाशनगरमध्ये डॉ. डोंगरे राहातात. पुरस्कार मिळाल्याची माहिती मिळाल्यानंतर आपल्याला आनंद झाला अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली. या पुरस्कारामुळे अधिक काम करण्यास प्रोत्साहन मिळेल असंही ते म्हणाले. इतरांचे आश्रू आपल्याला पुसता आले. तेच काम यापुढेही सुरू ठेवणार असल्याचं ते म्हणाले. गेली पन्नास वर्ष आपण गोरगरिबांसाठी काम करत आहोत. हे कामा आणखी जोमाने करून. त्यासाठी या पुरस्काराने आपल्याला शक्ती दिल्याचं ही ते म्हणाले.
( नक्की वाचा : Padma Award: पद्मश्री पुरस्काराने सन्मानित चैत्राम पवार कोण आहेत ? )
अटलबिहारी वायजेपी यांनाही त्यांनी औषधं दिली आहेत. शिवाय शिवसेना प्रमुख बाळासाहेबा ठाकरे यांच्यासाठी ही आपण 4 वर्ष औषधं घेवून मुंबईत जात होतो असं ही त्यांनी यावेळी सांगितलं. या दिग्गजां शिवाय त्यांनी सर्व सामान्यांना आपली सेवा माफक दरात दिली होती. उपचार करताना ते रुग्णाकडून अतिशय नाममात्र शुल्क घेत होते. त्यांनी आतापर्यंत एक लाखा पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार केले आहेत. त्यांनी नागपूरात होमिओपॅथी क्लिनिक स्थापन केली.
ट्रेंडिंग बातमी - Padma Shri Maruti Chitampalli : वन अधिकारी मारुती चितमपल्ली अरण्यऋषी कसे बनले?
त्यांनी त्वचा व मानसिक आजारांवर ही उपचार केले. 'नाडी' परीक्षणाद्वारे अचूक निदान करणे हा त्यांचा हातखंड होता. एकीकडे त्यांनी रुग्ण सेवा देत असताना दुसरीकडे चांगले डॉक्टर तयार करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. त्यांनी अनेक नवख्या डॉक्टरांना प्रशिक्षण दिले. 10 वर्षा पुर्वी ते दृष्टीहीन झाले होते. पण त्यावर मात करत आज ही ते आपली सेवा रुग्णांना देत आहेत. त्यांच्या या कार्याचा खऱ्या अर्थाने गौरव केला गेला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world