जाहिरात

Pahalgam Terror Attack : पुण्यातील पर्यटकाला दिसले संशयित दहशतवादी! NIA च्या तपासाला मिळणार गती

Pahalgam Terror Attack : पुणे जिल्ह्यातले श्रीजीत गणेशन हा हल्ला तेव्हा कुटुंबासोबत पर्यटनासाठी गेले होते. त्यांनी मोबाईलमध्ये काढलेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये संशयित दहशतवादी कैद झाल्याचा दावा केला आहे.

Pahalgam Terror Attack : पुण्यातील पर्यटकाला दिसले संशयित दहशतवादी! NIA च्या तपासाला मिळणार गती
पुणे:

सूरज कसबे, प्रतिनिधी

Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर संशयित दहशतवाद्यांचे फोटो समोर आले आहेत. पुणे जिल्ह्यातले देहू रोडचे रहिवाशी श्रीजीत गणेशन देखील हा हल्ला तेव्हा कुटुंबासोबत पर्यटनासाठी गेले होते. त्यांनी मोबाईलमध्ये काढलेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये संशयित दहशतवादी कैद झाल्याचा दावा केला आहे. गणेशन यांनी ही माहिती NIA ला (national intelligence agency)  देखील दिली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

नेमकं काय घडलं?

पहलगाम पासून साडेसात किलोमीटर अंतरावर असलेल्या 'बेताब व्हॅली' मध्ये श्रीजीत आणि त्यांचे कुटुंबीय गेले होते. बेताब व्हॅली हे काश्मीरमध्ये जाणाऱ्या पर्यटकांचं मोठं आकर्षण केंद्र आहे. त्या ठिकाणी श्रीजित त्यांच्या मुलीचे रिल्स चित्रीत करत होते. हा व्हिडिओ सुरु असतानाच  दोन दहशतवादी मुलीच्या पाठीमागून जात असल्याचं त्यांच्या मोबाईलमध्ये कैद झाल्याचं श्रीजीत यांनी सांगितलं. 
श्रीजीत रमेशन यांनी याबाबतची माहिती NIA (national intelligence agency) ला दिली असून या व्हिडिओ आणि फ़ोटोची संपूर्ण तपासणी ही NIA कडून केली जात आहे.

( नक्की वाचा : बंदुकीतून धाडधाड सुटणाऱ्या गोळ्या, चेहऱ्यावर मृत्यूची भीती! पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा भयंकर Video )
 

नव्या पुराव्यानंतर प्रश्न

श्रीजीत गणेशन यांनी सर्व माहिती NIA ला दिली आहे. या पुराव्याची तपासणी होईल. पण, त्यामुळे काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झाले आहेत. 

1) बेताब व्हॅली मध्ये हे दहशतवादी मागील अनेक दिवसांपासून वास्तव्यास होते का? 
2) बेताब व्हॅली परिसरात ते अनेक दिवसांपासून रेकी करत होते का? 
3) बेताब व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांना पळून जाण्यासाठी किंवा लपण्यासाठी जागा नव्हती. त्यामुळे त्यांनी पहलगाममध्ये हल्ला करण्याचे ठरवले का? 
4) बेताब व्हॅली पेक्षा पहलगामला जास्त पर्यटक येत असतात. त्यामुळे या दहशतवाद्यांनी पहलगाम हे ठिकाण निवडले का?

दहशतवाद्यांविरोधात कारवाई

काश्मीरमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांवर भारतीय लष्कराचा हल्ला सुरूच आहे. पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवाद्यांची आणखी दोन घरे लष्कराने उद्ध्वस्त केली आहेत. या दहशतवाद्यांची घरे पुलवामाच्या आसपास असल्याचे सांगितले जाते. शुक्रवारी, पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवादी आदिल आणि आसिफ यांची घरेही लष्कराने आयईडी स्फोटांद्वारे उद्ध्वस्त केली.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: