
Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आणखी एक भयंकर व्हिडिओ (Pahalgam Terrorist Attack Video) समोर आला आहे. बैसरन घाटीमध्ये सुट्टीचा आनंद घेत असलेल्या पर्यटकांवर दहशतवादी गोळीबार करत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. गोळ्यांचा आवाज ऐकताच घाबरलेल्या पर्यटकांची पळापळ होत आहे. हा व्हिडिओ अतिशय अस्वस्थ करणारा आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अस्वस्थ करणारा व्हिडिओ
पृथ्वीवरील नंदनवन समजल्या जाणाऱ्या काश्मीरच्या निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद पर्यटक घेत होते. त्याचवेळी काही अतिरेकी तिथं आले आणि त्यांनी गोळीबार सुरु केला, हे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. गोळीबार सुरु होताच एक पर्यटक जमिनीवर पडला. त्यानंतर दहशतवादी पुढं येऊन दुसऱ्या पर्यकांवर गोळीबार करत होते.
( नक्की वाचा : 'तू बाहेर ये, कलमा म्हण', लेकीसमोर घातल्या वडिलांच्या छातीत गोळ्या, पुण्यातल्या मुलीनं सांगितला सर्व प्रसंग )
गोळ्यांचे आवाज ऐकू येताच बैसरन घाटीमधील आनंदी आणि उत्साही वातावरण एका क्षणात बदललं. तिथं गोंधळ सुरु झाला. पर्यटक आपला जीव वाचवण्यासाठी इकडं -तिकडं पळू लागले, असा हा भयंकर व्हिडिओ आहे.
पहलगाम आतंकी हमले का नया वीडियो आया सामने, वीडियो में आतंकी एक शख्स को गोली मारता दिखाई दिया#PahalgamTerrorAttack | @jayakaushik123 | @mukeshmukeshs pic.twitter.com/Y91hCXaNDy
— NDTV India (@ndtvindia) April 26, 2025
पर्यटकांना घातल्या गोळ्या
बैसरनमध्ये सर्वत्र मोकळं मैदान असल्यानं पर्यटकांना लपण्यासाठी कोणतीही जागा नव्हती. त्यामुळे त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. दहशतवाद्यांनी काही जणांना अगदी ठरवून लक्ष्य केलं.

हा व्हिडिओ खूप दूरवरुन शूट केला आहे. त्यामुळे या व्हिडिओमध्ये सर्व काही लहान दिसत आहे. तसंच या गोळीबारात किती जणांचा जीव वाचला हे स्पष्ट झालेलं नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world