जाहिरात

Crime News : आधी मुलाला संपवलं मग आत्महत्या केली, पालघरमधील घटनेने खळबळ

Palghar Crime news : आदित्य उर्फ भावेश शरद भोये (वय 15) असे हत्या करण्यात आलेल्या मुलाचे नाव असून, शरद रघुनाथ भोये (वय 40) असे आत्महत्या करणाऱ्या वडिलांचे नाव आहे.

Crime News : आधी मुलाला संपवलं मग आत्महत्या केली, पालघरमधील घटनेने खळबळ

मनोज सातवी, पालघर

Palghar news : वडिलांनीच आपल्या 15 वर्षांच्या मुलाची हत्या केल्याची आणि त्यानंतर स्वत: आत्महत्या केल्याची घटना पालघरच्या जव्हार तालुक्यातून समोर आली आहे. आदित्य उर्फ भावेश शरद भोये (वय 15) असे हत्या करण्यात आलेल्या मुलाचे नाव असून, शरद रघुनाथ भोये (वय 40) असे आत्महत्या करणाऱ्या वडिलांचे नाव आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

आदित्यचे आजोबा रघुनाथ हे त्यांच्या पिंपळशेत होळीची माळी येथील त्यांच्या शेतावरील घरी गेले होते. त्यावेळी त्याचा 15 वर्षांचा नातू भावेशचा मृतदेह घरात रक्ताच्या थारोळ्यात पडला होता आणि दुसऱ्या खोलीत त्याचा मुलगा शरद गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. 

घटना उघडकीस आल्यानंतर नागरिकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. काही वेळातच जव्हार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोनही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. 

(नक्की वाचा-  नशेचे इंजेक्शन, बिअर पाजून महिलेवर सामूहिक अत्याचार, राजकीय पुढाऱ्याचा ही समावेश)

शरद भोये यांनी मुलाची हत्या नेमकी का केली? याचे कारण समजू शकलेले नाही. याप्रकरणी जव्हार पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेच्या कलम 103 (1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com