
मनोज सातवी, पालघर
Palghar News : पालघरच्या केळवा बीच येथील राऊत रिसिडेन्सी रिसॉर्टमध्ये गोळीबाराचाी घटना घडली आहे. या घटनेत 17 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गावठी कट्ट्यातून झाडलेली गोळी मुलीच्या मानेत अडकली. तिच्या शस्त्रक्रिया काढून ही गोळी काढण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी तिचा प्रियकर दिनेश धोडी याच्यासोबत केळवा येथील राऊत रेसिडेन्सी या रिसॉर्टवर गेली होती. तिथे प्रियकराकडे असलेल्या पिस्तुलातून गोळी सुटून मुलीच्या मानेत अडकली होती. घटनेनंतर मुलीच्या मानेतून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला होता. सुरुवातीला तिला उपचारासाठी माहीम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून नेण्यात आले होते. मात्र प्रकृती गंभीर झाल्याने तेथून तिला बोईसर येथील लाईफ लाईन या खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले होते.
(नक्की वाचा- BLA Attack: बलूच लिबरेशन आर्मीचा पाकिस्तानातील शहरावरच कब्जा, सरकारी कार्यालये ताब्यात)
मात्र पिस्तुलातून गोळी कशी झाडली गेली याचा अधिक तपास पोलीस करत आहेत. मात्र पोलिसांनी याप्रकरणी प्रियकर दिनेश धोडीला अटक केली आहे. आरोपी प्रियकर दिनेश धोडीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्याच्याकडे पिस्तूल कुठून याचा शोध सुरू आहे. आज आरोपी दिनेश धोडीला पोलीस पालघर न्यायालयात हजर करणार आहेत.
(नक्की वाचा : Vaishnavi Hagawane: 'वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत...' हगवणे कुटुंबीयांच्या वकिलाचा गंभीर आरोप! वाचा कोर्टात काय घडलं )
या घटनेची पालघरचे नवीन पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. हॉटेल व्यवसायिकांनी नियमांचे पालन करावे, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल. तसेच पालघरमधील अवैध धंद्याना आळा घालण्यासाठी कटीबंद्ध राहणार असल्याची ग्वाही पोलीस अधीक्षकांनी दिली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world