जाहिरात

Palghar News: नाकाबंदीत ट्रिपल सीट आले, मोठ्या गुन्ह्याचे बिंग फुटले, 'असा' लागला छडा

वाहतूक शाखेचे अंमलदार मोहन मुंडे यांच्या प्रसंगावधानामुळे हा गुन्हा उघडकीस आला.

Palghar News: नाकाबंदीत ट्रिपल सीट आले, मोठ्या गुन्ह्याचे बिंग फुटले, 'असा' लागला छडा
AI Image
  • पालघर जिल्ह्यातील मनोर येथे वाहतूक नाकाबंदी दरम्यान चोरीची दुचाकी पकडण्यात आली
  • वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी सतर्कतेने दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला
  • नाकाबंदी दरम्यान ट्रिपल सीटवर प्रवास करणाऱ्या युवकांची तपासणी केली असता चोरीचा गुन्हा उघड झाला
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
पालघर:

मनोज सातवी

कोणत्या गुन्ह्याचा उलगडा कधी होईल हे सांगता येत नाही. चोरांची किंवा गुन्हेगारांना एक चुक महागात पडते आणि ते थेट गजा आड जातात. पोलीसांचा चाणाक्षपणा ही त्यासाठी महत्वाचा असतो. पोलीस सतर्क असले तर कोणताही गुन्हेगार त्यांच्या नजरेतून वाचू शकत नाही. असाच एक प्रकार पालघर जिल्ह्यात घडला आहे. पालघरच्या मनोरमध्ये नाकाबंदी असताना पोलीसांनी एक गुन्ह्याचा छडा लावला. शिवाय तीन युवकांना या प्रकरणी अटक ही केली. त्यामुळे पोलीसांच्या कामगिरीचे कौतूक होताना दिसत आहे. 

पालघर जिल्ह्यातील मनोर येथे नाकाबंदी सुरू होती. प्रत्येक वाहन चेक केले जात होते. त्यावेळी एका दुचाकीवर ट्रिपल सीट युवक येत होते. त्यावेळी त्यांना नाकाबंदीत अडवण्यात आले. ट्रिपल सीट प्रवास करत असलेल्या दुचाकीस्वाराला दंड आकाला जात होता. हा दंड ऑनलाईन केला जात होता. त्यावेळी तपासणीमध्ये ही दुचाकी चोरीची असल्याचे समोर आले. सतर्क असलेल्या वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला. चौकशी केली असता या तिघांनाही पोलीसांनी ताब्यात घेतलं. 

नक्की वाचा - FASTag Pass: 3000 रुपये विसरा, राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणं आणखी महागणार; टोल पासची नवी किमत जाणून घ्या

 वाहतूक शाखेचे अंमलदार मोहन मुंडे यांच्या प्रसंगावधानामुळे हा गुन्हा उघडकीस आला.  या प्रकरणातून दुचाकी चोरीचे आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  मनोर-पालघर रस्त्यावरील बिरसा मुंडा चौकात जिल्हा वाहतूक शाखेकडून नाकाबंदी सुरू असताना  ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या दुचाकीवरील तिघांना अडवण्यात आले. चौकशीदरम्यान दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाल्याने तिघांना ताब्यात घेऊन बोरिवली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

नक्की वाचा - Bhandara News: नर्सचं प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणींना करावं लागलं नको ते काम, Video व्हायरल होताच खळबळ

अनेक वेळा चोर चोरी करून निसटतात. काही काळ ते पकडले ही जात नाहीत. पण कधी ना कधी ते पोलीसांच्या हातात लागतात. असचं काहीसं या केसमध्ये झालं आहे. ऑनलाईन चेकींगचा फायदा यामुळे झाल्याचं ही दिसून आलं आहे. तंत्रज्ञानाचा फायदा पोलीसांना ही त्यांच्या तपासात होताना दिसत आहे. त्यामुळेच चोरीला गेलेलं वाहन परत मिळालं आहे. सहजासहजी चोरीला गेलेलं वाहन, त्यातल्या त्यात दुचाकी वाहन हे परत मिळत नाही. मात्र या केस मध्ये पोलीसांनी ते रिकव्हर केलं आहे.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com