जाहिरात

Pandharpur City Photos: चंद्रभागेच्या तीरी! पंढरपुरातील चंद्रभागेच्या काठ परिसरातील मंत्रमुग्ध करणारे 8 फोटो

Pandharpur City Photos: पंढरपूर शहराचे सुंदर आणि मनमोहक फोटो पाहिले का?

Pandharpur City Photos: चंद्रभागेच्या तीरी! पंढरपुरातील चंद्रभागेच्या काठ परिसरातील मंत्रमुग्ध करणारे 8 फोटो
Pandharpur City Photos: पंढरपूर शहराचे सुंदर फोटो
Rahul Godse

Pandharpur City Photos: पंढरपूर हे सोलापूर जिल्ह्यातील एक धार्मिक शहर म्हणून प्रसिद्ध आहे. भीमा नदीच्या काठावर वसलेले हे शहर विठ्ठल देवाचे प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. आषाढी वारीनिमित्त लाखो भाविक लाडक्या विठुरायाच्या दर्शनसाठी येथे दाखल होतात. या शहराला धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. वारकरी सांप्रदायासाठी पंढरपुरातील विठ्ठल दर्शनाचा सोहळा प्रचंड मोठा असतो. वारी असताना या परिसराचे सौंदर्य काही औरच असते. पण वारी नसतानाही या शहराचे रुप किती सुंदर आहे, याचे दर्शन आम्ही तुम्हाला घडवणार आहोत. 

प्रसिद्ध फोटोग्राफर राहुल गोडसे यांनी त्यांच्या कॅमेऱ्यातून टिपलेले सुंदर-सुंदर फोटो पाहुया....

सूर्योदयावेळेचे मन प्रसन्न करणाऱ्या वातावरणाचे मनमोहक दृश्य  

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Rahul Godse

पंढरपुरात विठ्ठल मंदिरानंतर वारकऱ्यांना प्रिय आहे ते चंद्रभागा वाळवंटाचा परिसर. याच वाळवंटात भक्त पुंडलिकांसह अनेक संतांची मंदिरे देखील आहेत. याच मंदिरांचे चंद्रभागेमध्ये उमटलेले प्रतिबिंब.

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Rahul Godse

चंद्रभागेच्या पाण्यातील प्रतिबिंब, त्यामध्ये दिसणारे मंदिराचे शिखर आणि ढग लपंडाव खेळत असल्यासारखे भासते. मंदिराचे शिखर सुंदर की अवकाशातील ढग याचीच स्पर्धा पाण्यातील प्रतिबिंबात दिसते. 

(नक्की वाचा: Pandharpur Vitthal Temple: गरिबाच्या विठ्ठलाची वाढली श्रीमंती, आषाढी वारीत जमा झाले इतके दान)

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Rahul Godse

इंद्रधनुष्याच्या सप्तरंगांची उधळण आणि त्यातून तयार झालेली चंद्रकोर.

(नक्की वाचा: Guru Purnima 2025: गुरूचा एक आदेश अन् शिष्याने विठ्ठलाच्या चरणी केलं इतकं मोठं दान की, तुम्ही म्हणाल...)

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Rahul Godse

चंद्रभागा अर्थात भीमा नदीत असणाऱ्या होड्यांपुढे घोड्यांची प्रतिकृती आहे. आज दुर्मीळ होत जाणारा घोड्याचा टांगा देखील पंढरपुरात आहे. अशातच नौका देखील पाण्यात घोड्याच्या चपळाईने फिरते. याच घोड्यासारख्या नौका यांचे बोलके चित्र आहे.

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Rahul Godse

माझे जिवींची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी... वारकरी आणि विठ्ठल भक्तासाठी भगव्या रंगाचा पताका म्हणजेच त्याची गुढी.  

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Rahul Godse

चंद्रभागा वाळवंटातील अनेक जुनी दगडांच्या मदतीने बांधलेली मंदिरे म्हणजे शिल्पकलेचा अद्भुत नमुना, चंद्रभागेचे सुंदर विहंगम दृश्य.  

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Rahul Godse

पंढरपुरातील हे सुंदर फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला या शहराला भेट देण्याची नक्कीच इच्छा होईल.

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Rahul Godse

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com