
संकेत कुलकर्णी
अतिवृष्टीमुळे राज्यात अनेक ठिकाणी महापूर आला होता. त्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सरकारने आपल्यापरीने मदतीची घोषणा केली. त्यानंतर काही व्यक्ती, संस्थां ही मदतीसाठी पुढे आल्या. त्यात पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीने ही पुढाकार घेतला होता. शिवाय पूरग्रस्तांसाठी एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. मात्र ही मदत अजून ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मिळाला नाही. मदतीची घोषणा करून पंधरा दिवस झाले. पण निधी अजूनही का दिला गेला नाही अशी चर्चा सुरू झाली आहे.
मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांना स्वतः मुख्यमंत्र्यांकडे धनादेश सुपूर्त करायचा होता. या कारणास्तव निधी देण्याचे रखडले असल्याची चर्चा मंदिर वर्तुळात आहे. पूरग्रस्तांना मदत मिळाली यासाठी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर समितीने 28 सप्टेंबर रोजी एक पाऊल पुढे टाकले होते. समितीने एक कोटीची मदत जाहीर केली होती. पण औसेकर महाराज आणि समिती सदस्यांना मुंबईला जायला अजून वेळ मिळाला नाही.
नक्की वाचा - Pune News: धक्कादायक! राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये रॅगिंग? कॅडेटसोबत भयंकर घडलं
या कारणाने निधीच मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला नसल्याची धक्कादायक बाब पुढे येत आहे. यामध्ये शासन मान्यतेमुळे अद्याप धनादेश दिला नसल्याचे जरी सांगण्यात येत असले, तरी विधी व न्याय विभागातून तात्काळ मंदिर समितीला एक कोटी रुपये देण्यासाठी मान्यता मिळाली होती. अशी माहिती सुत्रांकडून समजत आहे. मग पूरग्रस्तांची मदत देणे कुठल्या कारणासाठी थांबले? असा प्रश्न पुढे येत आहे.
पंढरपूरच्या विठ्ठलाकडे 170 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. तर गतवर्षी 69 कोटी रुपयांचे दान तथा उत्पन्न मंदिराला मिळाले. त्यामुळे एक कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणे हे मंदिराला अवघड नाही. मात्र अद्याप पर्यंत हा निधी द्यायला विलंब का होतोय ? याचीच चर्चा सर्वत्र आहे. मदत जाहीर करून पंधरा दिवस झाले आहेत. ही मदत देण्यासाठी अजून किती दिवस लागणार अशी ही चर्चा ही रंगली आहे. त्यामुळे ही मदत कधी मिळणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world