जाहिरात

Tukaram Maharaj Palkhi Marg 2025 : तुकारामांच्या पालखीदरम्यान पावसाचा काय आहे अंदाज? कधी पावसाची शक्यता

दुसरीकडे संत तुकाराम महाराजांची पालखी लोणी काळभोरहून यवतच्या दिशेने निघाली आहे. या पालखीचा आजचा मुक्काम यवतमध्ये असेल. 

Tukaram Maharaj Palkhi Marg 2025 : तुकारामांच्या पालखीदरम्यान पावसाचा काय आहे अंदाज? कधी पावसाची शक्यता

आषाढी एकादशीसाठी दोन्ही पालख्या मार्गस्थ झाल्या आहेत. संत तुकाराम महाराज पालखीचा (18 जूनला मार्गस्थ) आज सहावा दिवस आहे तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा (19 जून) आज पाचवा दिवस आहे.  

आषाढी वारी ही महाराष्ट्रातील महत्त्वाची धार्मिक यात्रा आहे. या वारीला राज्यभरातील कानाकोपऱ्यातील भाविक वारीत सामील होत असतात. पायी चालत, भूक, तहान विसरून भाविक या वारीत सहभागी होतात. मनी-ध्यानी फक्त विठ्ठल असतो. विठ्ठलाचं नामस्मरण करीत दिंडी चालत असते. 13 व्या शतकापासून सुरू झालेली ही परंपरा आजही दरवर्षी साजरी केली जाते. या वारीत शिस्त असते. विठ्ठलाचं प्रेम असतं. कोणताही जाती-भेद, वर्ण भेद न करता केवळ विठ्ठल या एक सूत्रात सर्व भाविक बांधले गेलेले असतात. 

Pune Palkhi 2025 Live Check : माऊलींची पालखी आज दिवसभरासाठी सासवडमध्येच विसावली, नेमका कुठे मुक्काम?

नक्की वाचा - Pune Palkhi 2025 Live Check : माऊलींची पालखी आज दिवसभरासाठी सासवडमध्येच विसावली, नेमका कुठे मुक्काम?

या विठ्ठल सोहळ्याच्या दोन महत्त्वाच्या पालख्या आहेत. त्यातील एक संत तुकाराम महाराज पालखी आणि दुसरी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी. सध्या संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडमध्ये विसावली आहे. ज्ञानेश्वर पालखीमध्ये सर्वात मोठा टप्पा हा पुणे ते सासवडचा असतो. 30 किलोमीटरच्या टप्प्यात वारकऱ्यांना अवघड असता दिवेघाट पायी पार करायचा असतो. त्यामुळे या प्रवासाचा थकवा पाहता आजही ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडलाच मुक्कामी असणार आहे. उद्या ही पालखी 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या जेजुरीसाठी प्रस्थान करेल. 

दुसरीकडे संत तुकाराम महाराजांची पालखी लोणी काळभोरहून यवतच्या दिशेने निघाली आहे. या पालखीचा आजचा मुक्काम यवतमध्ये असेल. 

Latest and Breaking News on NDTV

संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी वेळापत्रक 2025 (Pune Palkhi 2025 )

    • 19 /06/2025 माऊली पालखी प्रस्थान आळंदी
    • 20/06/2025 आळंदी ते पुणे, 29 कि.मी 
    • 21/06/2025 पुणे मुक्काम 
    • 22/06/2025 पुणे ते सासवड, 32 कि.मी
    • 23/06/2025 सासवड मुक्काम 
    • 24/06/2025 सासवड ते जेजुरी, 16 कि.मी
    • 25 /06/2025 जेजुरी ते वाल्हे, 12 कि.मी
    • 26 /06/2025 वाल्हे ते लोणंद, 20 कि.मी
    • माऊलींना निरास्मान 
    • 27/06/2025 लोणंद ते तरडगाव, 08 कि.मी 
    • 28/06/2025 तरडगाव ते फलटण, 21 कि.मी 
    • 29/06/2025 फलटण ते बरड, 18 कि.मी 
    • 30/06/2025 बरड ते नातेपुते, 21 कि.मी 
    • बरड येथे गोल रिंगण
    • 01/07/2025 नातेपुते ते माळशिरस, 18 कि.मी 
    • सदाशिवनगर येथे गोल रिंगण
    • 02/07/2025 माळशिरस ते वेळापूर, 19 कि.मी 
    • खुडूस येथे गोळ रिंगण
    • 03/07/2025 वेळापूर ते भंडी शेगाव, 21 कि.मी 
    • ठाकूर बुवा समाधी गोल रिंगण आणि टप्पा येथे बंधू भेट सोहळा
    • 04/07/2025 भंडी शेगाव ते वाखरी, 10 कि.मी
    • बाजीराव विहीर येथे उभे रिंगण 
    • 05/07/2025 वाखरी ते पंढरपूर, प्रवास व पौर्णिमेपर्यंत पंढरपूर मुक्काम
    • वाखरी येथे गोल रिंगण 
    • 06/07/2025 देवशयनी आषाढी एकादशी
    • 10 /07/2025 पंढरपुरातून आळंदीकडे परतीचा प्रवास


    संत तुकाराम महाराज पालखीदरम्यान पावसाचा अंदाज...

    बारामती ते इंदापूर मार्गे निमगाव केतकी हा टप्पा २६ ते ३० जूनदरम्यान पार पडणार आहे. यावेळी हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार, या कालावधीत आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर इंदापूर ते पंढरपूर मार्गावरील अकलूज येथे एक ते दोन ठिकाणी हल्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 


    संत ज्ञानेश्वर महाराज पालखीदरम्यान पावसाचा अंदाज...

    सासवड ते वाल्हे मार्गावर उद्या २४ जून रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

    त्यानंतर लोणंद ते बरड मार्गावर फलटण या घाट भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. २६ जून ते २९ जूनदरम्यान घाट भागात अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

    पालखीच्या चौथ्या टप्प्यात बरड ते वेळापूर या मार्गावर माळशिरस येथे हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com