जाहिरात
Story ProgressBack

'सध्याच्या काळात निवडणूक लढणं जड झालयं' NDTV मराठीला पटेलांची खास मुलाखत

Read Time: 3 min
'सध्याच्या काळात निवडणूक लढणं जड झालयं' NDTV मराठीला पटेलांची खास मुलाखत
मुंबई:

पुर्वी निवडणुका म्हटल्या की तळागाळापर्यंत पोहचावं लागत होते. त्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागत होते. मात्र आता लोकां पर्यंत पोहोचणं सहज सोपं झालं आहे. पण हे होत असताना निवडणूका लढणं हे जड होऊन बसलं आहे. ज्या वेगाने चुकीच्या गोष्टी पसरवल्या जातात त्यामुळे निवडणूक लढणं अवघड होऊन बसलं आहे असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी व्यक केले आहे. NDTV मराठीच्या लाँचिंग वेळी दिलेल्या खास मुलाखतीत ते बोलत होते.   

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

प्रफुल्ल पटेल यांनी मुलाखतीच्या सुरूवातीला NDTV मराठीला शुभेच्छा दिल्या. एक न्युज चॅनेल म्हणून वेगळी ओळख निर्माण करावी यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. यानंतर त्यांनी राजकारणावरही भाष्ट केले.  मागील पाच वर्षात महाराष्ट्रात खुप सारे राजकीय भूकंप झाले. पहिल्यांदाच राज्यात आपण नवीन समिकरणे ही पाहीले. गेल्या चार वर्षात तीन सरकारे जनतेने पाहीले. हाच राजकारणातला स्पेस असतो असेही त्यांनी स्पष्ट केले.  

हेही वाचा - "आमचं सरकार आल्याने अडीच वर्षांची नकारात्मकता गेली"; 'NDTV मराठी'वर CM एकनाथ शिंदेंची खास मुलाखत

लोकसभेची सध्या निवडणूक होत आहे. या निवडणुकीत राष्ट्रीय पातळीवरच्या मुद्द्यांवर विचार मतदान करताना होईल असेही पटेल म्हणाले. गेल्या दहा वर्षात जो विकास देशात झाला आहे त्याचाही विचार नक्कीच केला जाईल. यावेळी तरूण मतदारांची संख्या मोठी असल्याचेही ते या निमित्ताने म्हणाले. एकीकडे मोदीजींचे नेतृत्व आहे. नेतृत्व कर्तुत्व एकीकडे आहे. तर दुसरीकडे अस्थिर सरकार द्यावे, कोणी नेतृत्व करावे हे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. अशा स्थितीत ही निवडणूक होत आहे. महाराष्ट्राचे देशासाठी मोठे योगदान आहे. त्यामुळे इथली जनताही लोकसभे मतदान करतातना विवेकाने मतदान करतील असे ते म्हणाले. 

हेही वाचा - पालघरची जागा भाजपा लढवणार, 'NDTV मराठी' च्या लोकार्पण कार्यक्रमात फडणवीसांची घोषणा

महाराष्ट्राच्या विकासाचे आणि पुढच्या पिढीचे कल्याण करण्याचे व्हिजन असल्याचे प्रफुल्ल पटेल म्हणाले. हे व्हिजन सरकारमधील तीनही पक्षांचे असल्याचे त्यांनी सांगितले. मोदींजीचे जे व्हिजन आहे त्याच्या बरोबरच आम्ही चाललो आहोत. गेल्या दहा वर्षात मोठी क्रांती देशात झाली आहे. 40 कोटी गरीबांना गरीबी बाहेर काढण्याचे काम मोदी सरकारने केल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. परदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात येत आहेत. शिवाय एखादा प्रकल्प राज्याच्या बाहेर गेला तर मोठा आरडा ओरडा होतो. पण तो भारतातच आहे हेही लक्षात घेतले पाहीजे. सध्या राजकारणाचा स्थर खालावल्या बद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली.  

हेही वाचा - NDTV मराठीचा भव्य शुभारंभ, मान्यवरांच्या उपस्थितीत लाँचिंग सोहळा

महाष्ट्राचा विकासही झपाट्याने होत आहे. मुंबईचा चेहरा मोहरा बदलला गेला आहे. विदर्भही विकासाच्या मार्गावर आहे. पुणे हे सध्या देशाचे आयटी हब झाले आहे. शिवाय शिक्षणासाठी जगभरातून विद्यार्थी पुण्यात येतात. त्यामुळे विकासाची वाटचाल कशी होत आहे हेच यातून स्पष्ट होत आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination