Vasai News : सर्दी-खोकल्याने त्रस्त रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू; डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल

Vasai News : रुग्ण रुपेश लालमन गुप्ता याला सर्दी आणि खोकल्याचा त्रास छातीत दुखत असल्यामुळे 18 मार्च 2024 रोजी वसई पश्चिम येथील ब्रेथ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

जाहिरात
Read Time: 2 mins

मनोज सातवी, वसई

वसईत रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉक्टरवर हलगर्जीपणाचा आरोप करत माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रुपेश लालमन गुप्ता या 27 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची करण्यात आली होती. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मात्र जिल्हा शल्यचिकीत्सक पालघर यांच्या अभिप्राय आणि पोलिसांच्या तपासानंतर तब्बल 10 महिन्यांनी वसई पश्चिम येथील ब्रेथ केअर हॉस्पिटलचे मुख्य डॉक्टर धर्मेंद्र दुबे यांच्याविरोधात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी भारतीय दंड संहिता कलम 304 अन्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान गुन्हा दाखल होताच डॉ. धर्मेंद्र दुबे फरार झाला आहे. 

(नक्की वाचा-  Baramati Crime : अंत्यविधीची तयारी थांबली, 9 वर्षांच्या पीयुषच्या शवविच्छेदनानंतर बापाचं घृणास्पद कृत्य समोर )

रुग्ण रुपेश लालमन गुप्ता याला सर्दी आणि खोकल्याचा त्रास छातीत दुखत असल्यामुळे 18 मार्च 2024 रोजी वसई पश्चिम येथील ब्रेथ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार करून दुसऱ्या दिवशी सोडतो असे डॉक्टरांनी म्हटले होते. मात्र उपचारदरम्यान रुपेशचा मृत्यू झाला. परंतु रुपेशवर उपचारादरम्यान हलगर्जीपणा केल्याने त्याचा मृत्यू झाला, असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला होता. 

याप्रकरणी 20 मार्च 2024 रोजी माणिकपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती. याप्रकरणी तपास करताना पोलिसांना जी माहिती दिली त्यानुसार, या हॉस्पिटलचे मुख्य स्पेशालिस्ट डॉ. धर्मेंद्र दुबे यांनी उपचाराकरीता दाखल केले त्यावेळी रुग्ण अतिगंभीर असून देखील स्पेशालिस्ट डॉक्टरकडून उपचार करुन घेतले नाहीत. रुग्णाला श्वसनाचा त्रास होत होता तरी त्याला ऑक्सिजन सपोर्ट दिला नाही. या सर्वामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप डॉ. दुबे यांच्यावर आहे. 

Advertisement

(नक्की वाचा - Crime news: रेल्वेत नोकरीचं आमिष दाखवले, 17 जणांकडून 1 कोटी उकळले, शिंदेंच्या शहराध्यक्षाने हे काय केले?)

पोस्टमार्टम रिपोर्ट तसेच जिल्हा शल्यचिकीत्सक पालघर यांच्या चौकशी समितीचा अभिप्राय प्राप्त झाल्याने माणिकपूर पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 304 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या कलम 304 अंतर्गत गुन्ह्याचा आरोप न्यायालयात सिद्ध झाल्यास दोन वर्षांपर्यंत कारावास आणि दंड किंवा दोन्ही शिक्षा अशी शिक्षेची तरतूद आहे.

Topics mentioned in this article