जाहिरात

जय महाराष्ट्र, जय अटलांटा...! पुणेकर दाम्पत्य पाटील-कुलकर्णींची अमेरिकेत जोरदार चर्चा, कारण काय?

सध्या सोशल मीडियावर अमेरिकेतील अटलांटामधील या दाम्पत्याची मोठी चर्चा सुरू आहे.

जय महाराष्ट्र, जय अटलांटा...! पुणेकर दाम्पत्य पाटील-कुलकर्णींची अमेरिकेत जोरदार चर्चा, कारण काय?
पुणे:

शिक्षण किंवा नोकरीनिमित्त परदेशात स्थायिक होणाऱ्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. परदेशात मिळणारं उत्पन्न, सोयीसुविधा सुखकर असल्याने शिक्षणासाठी परदेशात गेलेली तरुण मंडळी तिथेच राहणं पसंत करतात. मात्र परदेशात राहत असताना आपल्या मातीची आठवण येत असतेच. पुन्हा मायदेशी न परतणारे नागरिक परदेशातच प्रयोग करीत काहीतरी उभं करण्याचा प्रयत्न करतात. 

सध्या सोशल मीडियावर अमेरिकेतील अटलांटामधील या दाम्पत्याची मोठी चर्चा सुरू आहे. मूळच्या पुण्याच्या असलेल्या या दाम्पत्याने अटलांटामध्ये पाटील-कुलकर्णी नावाचं फार्म (Patil Kulkarni Farm) सुरू केलं आहे. व्यवसायाने आयटी इंजिनियर असलेले आणि एका मोठ्या कंपनीत काम करणाऱ्या या दाम्पत्याने या भागात 'पाटील-कुलकर्णी'नावाचं फॉर्म उभं केलं केलं असून सध्या सोशल मीडियावर याची मोठी चर्चा होत आहे.

नक्की वाचा - मोठी बातमी : केदारनाथमध्ये महाराष्ट्रातले 120 जण अडकले, युद्धपातळीवर बचावकार्य सुरु

त्यांनी उभं केलेल्या या फार्मच्या जमिनीत त्यांनी शेती पिकवली आहे. विविध प्रकारच्या भाज्या, फळबागा लावल्या आहेत. या फार्ममध्ये एक छोटेखाली तलावही आहे. या फार्मात जनावरंही आहेत. फार्ममधील आयुष्य जगता यावं यासाठी त्यांनी थेट अटलांटामध्ये महाराष्ट्राप्रमाणे शेती उभी केली. कुठलंही रासायनिक खतं न वापरता कंपोस्ट खतांच्या माध्यमातून ते शेतीतून उत्पन्न घेत आहेत. याशिवाय त्यांनी ठिबक सिंचनाचा प्रयोग करीत विविध प्रकारचं उत्पादन घेतलं आहे. 

या फार्ममध्ये त्यांच्याकडे गाढव, घोडा, गीर गाई, कोंबड्या, शेळी देखील आहेत. या फार्ममध्ये त्यांनी विशेष फुलांची शेती केली असून याच्या माध्यमातून  ते शुद्ध मधदेखील तयार करतात. त्यांनी काही दिवसांपासून येथे फार्म टूरदेखील सुरू केली आहे. याच्या माध्यमातून अमेरिकेतील नागरिकांनी शेती, महाराष्ट्रीय पद्धतीची माहिती दिली जाते. याशिवाय अमेरिकेत राहूनही तुम्ही येथे महाराष्ट्रातील उत्तमोत्तम पदार्थांचा आस्वाद घेऊ शकतात. सध्या सोशल मीडियावर या दाम्पत्याचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहेत. अनेकांकडून त्यांचं कौतुकही केलं जात आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com