जाहिरात

Pehalgam attack: काश्मिरमध्ये अडकलेले 500 पर्यटक आतापर्यंत मुंबईत दाखल, विशेष विमानाने परतले

महाराष्ट्राच्या पर्यटकांना परत आणण्यासाठी मंत्रालय, मुख्यमंत्री कार्यालय आणि महाराष्ट्र सदनातील कक्ष अशी त्रिस्तरिय यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

Pehalgam attack: काश्मिरमध्ये अडकलेले 500 पर्यटक आतापर्यंत मुंबईत दाखल, विशेष विमानाने परतले
मुंबई:

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिल्यानंतर विविध प्रयत्नांतून गेल्या 2 दिवसात आतापर्यंत सुमारे 500 पर्यटक राज्यात परतले आहेत. राज्य सरकारने इंडिगो आणि एअर इंडिया अशी दोन विशेष विमाने पर्यटकांसाठी केली होती. त्यातून 184 पर्यटक मुंबईत दाखल झाले आहेत. दरम्यान, आणखी 232 प्रवाशांसाठी उद्या एका विशेष विमानाची व्यवस्था राज्य सरकार करीत आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेनंतर मंत्री गिरीश महाजन यांना तातडीने काश्मिरला जाण्यास सांगितले होते. गिरीश महाजन यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकूणच स्थितीचा आढावा घेतला होता. उद्यासाठी आणखी विमाने करायची असतील, तर करा, त्याचा खर्च राज्य सरकार देईल, फडणवीसांनी सांगितले. गिरीश महाजन यांनी लष्कराच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांची भेट ही घेतली. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी व्हीडिओ कॉलवर त्या पर्यटकांशी संवाद साधला. उपचार करणार्‍या तेथील डॉक्टरांचे ही विशेष आभार मानले.

ट्रेंडिंग बातमी - 'हो चूक झाली'! पहलगाम हल्ल्यात सरकारने कोणत्या चुका मान्य केल्या? सर्वपक्षीय बैठकीची Inside Story

महाराष्ट्राच्या पर्यटकांना परत आणण्यासाठी मंत्रालय, मुख्यमंत्री कार्यालय आणि महाराष्ट्र सदनातील कक्ष अशी त्रिस्तरिय यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून येणार्‍या विनंतीवर काम केले जात आहे. काही पर्यटकांची कालिका धाम, जम्मू येथे राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सरकारने केलेल्या या सोयी मुळे पर्यटकांनाही दिलासा मिळाला आहे. त्यांनीही सरकारचे विशेष आभार मानले आहेत.  

ट्रेंडिंग बातमी - Seema Haider: पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरला ही सोडावा लागणार देश? कायदा काय सांगतो?

अमरावतीमधील जळपास 14 पर्यटक येथे थांबले होते. काही पर्यटक मिळेल त्या व्यवस्थेने जम्मूवरुन दिल्लीकडे रवाना झाले आहेत. त्यांची दिल्ली येथे व्यवस्था करण्यात येत आहे. उद्या काश्मिरातून येणार्‍या विशेष विमानात अकोला, अमरावती येथील पर्यटक असणार आहेत. दिल्लीत महाराष्ट्र सदनात प्रवाशांच्या याद्या सातत्याने तयार केल्या जात आहेत. गरज पडली तर परवाही विशेष विमान करण्याची तयारी राज्य सरकारतर्फे करण्यात आली आहे.