Pimpri-Chinchwad: सावधान! वाकडमध्ये प्रवास करताना होऊ शकते फसवणूक; पाहा VIDEO, नेमकं काय होतंय?

Pimpri-Chinchwad: पिंपरी-चिंचवडच्या वाकड परिसरात वाहनचालकांना लुटणारी एक अट्टल टोळी सक्रिय झाली आहे. आलिशान कारला जाणीवपूर्वक दुचाकी घासून अपघाताचा बनाव करायचा आणि नुकसान भरपाईच्या नावाखाली कारचालकांकडून हजारो रुपयांची खंडणी उकळायची.

जाहिरात
Read Time: 2 mins

सूरज कसबे, पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad News: आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाकड परिसरात सध्या वाहनचालकांसाठी एक नवीन संकट उभं राहिलं आहे. महागड्या कारला लक्ष्य करून अपघाताचा बनाव करणारी आणि त्यातून खंडणी उकळणारी एक टोळी या भागात धुमाकूळ घालत आहे. विशेष म्हणजे, या टोळीचा कारनामा एका सजग नागरिकाच्या गाडीतील 'डॅश कॅम'मध्ये (Dash Cam) कैद झाला असून, या व्हिडिओने शहरात खळबळ उडवून दिली आहे.

कशी आहे या टोळीची 'मोडस ऑपरेंडी'?

मिळालेल्या माहितीनुसार, हे रॅकेट प्रामुख्याने आलिशान चारचाकी वाहनांना आपले सावज बनवते. चालत्या कारला आपली दुचाकी जाणीवपूर्वक हलकासा कट मारायची किंवा घासून न्यायची. त्यानंतर कार थांबवून "माझ्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे" असा आरडाओरडा सुरू करायचा. टोळीतील तरुण कारचालकाभोवती जमा होऊन त्याच्यावर मानसिक दडपण आणतात आणि वाद टाळण्यासाठी पैसे देण्यास भाग पाडतात.

Advertisement

(नक्की वाचा- Chhatrapati Sambhajinagar News: अजिंठा लेणी पाहायला गेलेल्या पर्यटकांची अचानक पळापळ, 11 पर्यटक जखमी)

पाहा VIDEO

डॅश कॅमने वाचवले पैसे!

एका कारचालकाने सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, कशाप्रकारे दुचाकीस्वार स्वतःहून कारला घासून जात आहे. जेव्हा चालकाने डॅश कॅम असल्याचे सांगितले, तेव्हा या भामट्यांनी तिथून पळ काढला. वाकड, हिंजवडी आणि डांगट पाटील नगर परिसरात अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. वाकड पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या संशयित टोळीचा शोध सुरू केला आहे.

(नक्की वाचा-  Arjun Tendulkar: वडील सचिन तेंडुलकर नाही तर...; हा खेळाडू आहे अर्जुनचा आदर्श

नागरिकांनी काय काळजी घ्यावी?

आपल्या वाहनात डॅश कॅम बसवणे आता केवळ हौस नसून गरज बनली आहे. हे सर्वात मोठे पुरावे ठरतात. अपघात झाल्यास आणि समोरची व्यक्ती विनाकारण वाद घालत असल्यास घाबरून त्वरित पैसे देऊ नका. अशा वेळी 112 क्रमांकावर फोन करा किंवा जवळच्या पोलीस चौकीत जाण्यास सांगा. बहुतांश वेळा पोलीस नावानुसार हे भामटे पळ काढतात.
 

Topics mentioned in this article