जाहिरात

Arjun Tendulkar: वडील सचिन तेंडुलकर नाही तर...; हा खेळाडू आहे अर्जुनचा आदर्श

Arjun Tendulkar: सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने आपल्या फलंदाजीच्या आदर्शाबाबत मोठा खुलासा केला. त्याने वडिलांचे नाव न घेता युवराज सिंहचे नाव घेतले आहे.

Arjun Tendulkar: वडील सचिन तेंडुलकर नाही तर...; हा खेळाडू आहे अर्जुनचा आदर्श

Arjun Tendulkar Interview: क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सध्या त्याच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आला आहे. शुभंकर मिश्रा यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना अर्जुनने आपल्या वैयक्तिक आवडीनिवडी आणि क्रिकेटमधील आव्हानांवर मोकळेपणाने भाष्य केले. फलंदाजीच्या आदर्शापासून ते आयपीएलमधील संघ बदलापर्यंत अर्जुनने अनेक गुपिते उघड केली आहेत.

फलंदाजीतील आदर्श कोण?

मुलाखतीदरम्यान जेव्हा अर्जुनला विचारण्यात आले की, सचिन व्यतिरिक्त तुझा आदर्श कोण आहे? तेव्हा त्याने क्षणाचाही विलंब न लावता युवराज सिंह याचे नाव घेतले. युवराजची आक्रमक फलंदाजी त्याला आकर्षित करते. मात्र, जेव्हा त्याला युवीच्या गोलंदाजीबद्दल विचारले, तेव्हा त्याने मिश्किलपणे उत्तर दिले की, "तो फिरकीपटू (Spinners) होता आणि मी वेगवान गोलंदाज आहे."

(नक्की वाचा-  Chhatrapati Sambhajinagar News: अजिंठा लेणी पाहायला गेलेल्या पर्यटकांचा अचानक पळापळ, 11 पर्यटक जखमी)

मुंबई इंडियन्सचा निरोप, लखनऊमध्ये एन्ट्री

या आयपीएल हंगामात अर्जुन तेंडुलकरच्या बाबतीत मोठी घडामोडी घडली आहे. मुंबई इंडियन्सने अनुभवी शार्दुल ठाकूरला आपल्या संघात घेण्यासाठी अर्जुन तेंडुलकरला लखनऊ सुपर जायंट्स (LSG) कडे ट्रेड केले आहे. आज लखनऊचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी इकाना स्टेडियमवर होणार आहे. शार्दुलच्या जागी आलेल्या अर्जुनला 'प्लेइंग 11' मध्ये स्थान मिळते की तो बेंचवरच राहतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

मुंबई सोडून गोवा का गाठले?

अर्जुनने आपल्या डोमेस्टिक क्रिकेट कारकिर्दीत मुंबईची साथ सोडून गोव्याकडून खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्यामागचे कारण सांगताना तो म्हणाला की, मुंबईच्या संघात स्पर्धा अत्यंत कठीण होती. एका तरुण खेळाडूसाठी मैदानावर उतरून अनुभव घेणे महत्त्वाचे असते. गोव्याच्या संघात त्याला अष्टपैलू खेळाडू म्हणून स्वतःला सिद्ध करण्याची आणि जास्त जबाबदारी घेण्याची संधी मिळाली, ज्यामुळे त्याच्या खेळात सुधारणा झाली आहे.

(नक्की वाचा-  Commercial LPG Cylinder: महागाईचा भडका! एलपीजी सिलेंडरच्या किमतीत पुन्हा मोठी वाढ)

"बेंचवर बसणे कोणालाच आवडत नाही"

मुंबई इंडियन्समध्ये कमी संधी मिळाल्याबद्दल विचारले असता, अर्जुनने उत्तर दिले. "प्रत्येक खेळाडूला मैदानावर उतरायचे असते, कोणालाही बेंचवर बसायला आवडत नाही. मात्र, संघ निवडीचा निर्णय व्यवस्थापनाचा असतो. खेळाडूचे काम केवळ मेहनत करणे आणि संधी मिळताच तिचे सोने करणे हेच असते," असे त्याने स्पष्ट केले.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com