सूरज कसबे, पिंपरी-चिंचवड
Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या इंद्रायणी नदी पात्रात लगत असलेल्या, निळ्या पूर रेषेत उभारलेल्या तब्बल 29 टोलेजंग बंगल्यावर महापालिकेने कारवाई केली आहे. सर्व बंगले आज पोलीस बंदोबस्तात पाडण्यात आले आहते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शनिवारी पहाटेपासून पिंपरी-चिंचवड महापालिकेने कारवाई सुरु केली होती. सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयानुसार सर्व बंगले आज पाडले जात आहेत.
हरित लवादाने दिलेल्या निर्णयानुसार ही कारवाई केली जात असल्याचं स्पष्टीकरण महापालिका आयुक्तांनी दिलं आहे. मात्र ज्या जागेवर बंगले उभारले गेले ती जागा विकणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाने आपली फसवणूक केली, त्याचबरोबर आर्थिक देवाण-घेवाण करून बंगले उभारण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी परवानगी दिल्याने आम्ही बांधकाम केलं होतं, अशी धक्कादायक माहिती संबंधित घर मालकांनी दिली.
(नक्की वाचा- अल्बेनियाच्या पंतप्रधानांनी जॉर्जिया मेलोनींसमोर टेकले गुडघे; VDEO व्हायरल)
अशा प्रकारे फसवणूक झाल्याने आता आपल्यावर होणारी कारवाई अन्यायकारक असल्याचं देखील घर मालक म्हणत आहेत. मात्र संबंधित बांधकाम अनधिकृत असल्याने त्यावर कारवाई केल्याचं सांगत, ब्लू लाइन अर्थात निळ्या पूर रेषेत अशा पद्धतीने जागेचा व्यवहार केल्या प्रकरणी, संबंधित जागा मालकाला तब्बल 5 कोटींचा दंड ठोठावला आहे. तो दंड देखील वसूल केला जाईल, अशी माहिती आयुक्त शेखर सिंग यांनी दिली आहे.