पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांचा अनागोंदी कारभार; 50 शाळांना मुख्याध्यापकच नाही, १७५ शिक्षकांची पदेही रिक्त

Pimpri-Chinchwad School News: 105 पैकी मराठी माध्यमाच्या 50 शाळांमध्ये पूर्णवेळ मुख्याध्यापक नाहीत. सध्या काही शाळांमध्ये फक्त वरिष्ठ शिक्षकांकडे प्रभारी मुख्याध्यापकाची जबाबदारी सोपवून कामकाज चालवले जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

सुरज कसबे, पिपरी चिंचवड

Pimpri Chinchwad : पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात असले, तरी प्रत्यक्षात या शाळांमध्ये मोठी अनागोंदी असल्याचे समोर आले आहे. महापालिका चालवत असलेल्या सुमारे 105 प्राथमिक शाळांपैकी 50 शाळांमध्ये पूर्णवेळ मुख्याध्यापकच नाहीत. त्यामुळे शाळांच्या व्यवस्थापनावर आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत असून, गरीब विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसत आहे.

शिक्षकांच्या पदांचा मोठा अभाव

पिंपरी-चिंचवड महापालिका बालवाडीपासून आठवीपर्यंतच्या 105 शाळा आणि 18 माध्यमिक शाळा चालवते, ज्यात जवळपास 50 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. यंदाच्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला आहे, तरीही या शाळांमध्ये शिक्षकांची मोठी कमतरता आहे. 105 पैकी मराठी माध्यमाच्या 50 शाळांमध्ये पूर्णवेळ मुख्याध्यापक नाहीत. सध्या काही शाळांमध्ये फक्त वरिष्ठ शिक्षकांकडे प्रभारी मुख्याध्यापकाची जबाबदारी सोपवून कामकाज चालवले जात आहे. याव्यतिरिक्त, पदवीधर आणि उपशिक्षकांची 175 पदेही रिक्त आहेत.

(नक्की वाचा-  Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सवात झळकणार 'ऑपरेशन सिंदूर'चे प्रतिबिंब; CM फडणवीसांचे मंडळांना आवाहन)

नियमांनुसार, 100 पेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या प्रत्येक शाळेत पूर्णवेळ मुख्याध्यापक असणे बंधनकारक आहे. परंतु, पिंपरी-चिंचवडमधील या नियमांकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. मुख्याध्यापक हे शाळेचे प्रमुख असल्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत शाळांचे दैनंदिन कामकाज आणि प्रशासकीय बाबी योग्य प्रकारे चालत नाहीत.

Ganeshotsav 2025: मुंबईकरांनो, कोकणात गणपतीला ST नेच जा! 30% भाडेवाढीचा 'तो' निर्णय रद्द

यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची हेळसांड होत असून, शैक्षणिक उपक्रम राबवण्यातही अडचणी येत आहेत. शहरातील गरीब आणि गरजू विद्यार्थी याच शाळांवर अवलंबून असल्यामुळे त्यांच्या भवितव्यावर याचा थेट परिणाम होत आहे. महापालिका प्रशासनाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन रिक्त पदे भरण्याची मागणी पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. अन्यथा, महापालिका शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्याचे प्रयत्न कागदोपत्रीच राहतील, अशी भीती व्यक्त होत आहे.

Advertisement

Topics mentioned in this article