Sindhudurg News: पोलिसांच्या कारची दुचाकीला जोरदार धडक, मालवण-कसाल रस्त्यावर भयानक घडलं, संपूर्ण परिसरात हळहळ

मालवण-कसाल रस्त्यावरील सुकळवाड येथे पोलिसांच्या बोलेरो गाडीने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली.या भीषण अपघातात दुचाकीस्वार जगदीश तुकाराम मांजरेकर (45) यांचा जागीच मृत्यू झाला.

जाहिरात
Read Time: 2 mins
Police Car And Bike Accident Sidhudurg

गुरूप्रसाद दळवी, प्रतिनिधी

Sindhudurg Accident News Today : मालवण-कसाल रस्त्यावरील सुकळवाड येथे पोलिसांच्या बोलेरो गाडीने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली.या भीषण अपघातात दुचाकीस्वार जगदीश तुकाराम मांजरेकर (45) यांचा जागीच मृत्यू झाला. मांजरेकर सुकळवाड भंडारवाडी येथील रहिवासी होते. त्यांच्या अपघाती निधनामुळे मांजरेकर कुटुंबीयांवर दुख:चा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मालवण येथून कसालच्या दिशेने पोलिसांची चारचाकी (एम एच 07 एएस 0961)जात होती.दरम्यान,सुकळवाड बाजारपेठ वरचानाका येथे समोरून येणाऱ्या दुचाकीला या पोलिसांच्या चारचाकीने जोरदार धडक दिली.ही धडक इतकी भीषण होती की,दुचाकीस्वार जगदीश मांजरेकर हे गंभीररित्या जखमी झाले.

Advertisement

नक्की वाचा >> Ind vs IRE : वैभव सूर्यवंशीला प्लेईंग XI मधून बाहेर ठेवलं, चाहते भडकले, गंभीर विरोधात मिम्सचा पाऊस

मांजरेकर यांना रुग्णालयात दाखल केले अन्..

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत जगदीश यांना तातडीने उपचारासाठी ओरोस जिल्हा रुग्णालयात दाखल केले.मात्र,रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृत जगदीश मांजरेकर हे सुकळवाड भंडारवाडी येथील स्थानिक रहिवासी होते.अपघाताची बातमी सुकळवाड परिसरात वाऱ्यासारखी पसरताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.पोलिसांच्या गाडीनेच हा अपघात झाल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.सिंधुदुर्ग पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. 

नक्की वाचा >> Maharashtra Rain : महाराष्ट्रात 'या' तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस, जूनमध्ये पाऊस पडला कमी, कारण आलं समोर