प्रांजल कुलकर्णी, नाशिक
शिवसेना ठाकरे गटाने पुन्हा एका पक्षबांधणी राज्यभर दौरे सुरु सुरु केले आहेत. विभागीय शिबिरांच्या माध्यमातून कार्यकर्ते, लोकांपर्यंत पोहोण्याचा कार्यक्रम ठाकरे गटाने आखला आहे. मुंबईतील शिबीर पार पडल्यानंतर नाशिकमध्ये पुढील शिबीर पार पडणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याबाबतची माहिती दिली. या शिबिरात दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची जुनी भाषणे देखील येथे ऐकवली जाणार आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शिवसेना ठाकरे गटाची संपूर्ण महाराष्ट्रात अशी विभागीय शिबीरं घेतली जाणार आहेत. नाशिकला 16 एप्रिल रोजी मनोहर गार्डन लॉन्स येथे शिवसेनेचे विभागीय शिबिर होणार आहे. दिवसभर हे शिबीर असणार आहे. प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन चर्चा होते. नाशिकच्या शिबिरात सुद्धा सुटसुटीतपणा आहे. उद्धव ठाकरे स्वत: इथे उपस्थित राहून सर्वांना मार्गदर्शन करतील, अशी माहिती देखील संजय राऊत यांना दिली.
(नक्की वाचा- Railway News : बदलापूरहून अर्ध्या तासात नवी मुंबई गाठता येणार; रेल्वेच्या नव्या मार्गाला मंजुरी)
दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे कधी न ऐकलेले भाषण येथे शिबिरात दाखवली जाणार आहेत. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून हे भाषण दाखवलं जाणार आहे. या निमित्ताने जणू बाळासाहेब एकप्रकारे उपस्थित राहणार आहेत, असंही संजय राऊत यांनी सांगितलं. प्रत्येक पदाधिकाऱ्याने शिबिरासाठी वाहून घेतले आहे. बऱ्याच काळानंतर उद्धव ठाकरे नाशिकला येणार आहे.
(नक्की वाचा- Nashik News : डीजेच्या आवाजामुळे 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू? नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार)
अमित शाहांसोबत सत्तेत जाणार नाही
कबरीला समाधीचा दर्जा दिला त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाही. अमित शाह यांच्यासोबत उद्धव ठाकरे कधीही जाणार नाहीत. अमित शाह यांच्यासोबत सत्तेत जाण्यासाठी आम्ही लाचार होणार नाही. लबाड्या करणाऱ्ंयासोबत आम्ही जाणार नाही, तळवे चाटणार नाही, अशी रोखठोक प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.