मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा परप्रांतियांचा मुद्दा उपस्थित केला आहे. यावरुन प्रकाश आंबेडकर यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. राज ठाकरेंविरोधात टाडा लावा आणि अटक करा अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं की, "राज ठाकरेंना टाडा,पोटा कायदा लावला पाहिजे. सरकारने मागेपुढे न पाहाता अशा लोकांना आत टाकलं पाहिजे. समाज दुभंगला की देश दुभंगतो. त्यामुळे यांना UAPA कायदा आणि NSA कायदा लागला पाहीजे. सरकारने हिम्मत दाखवावी."
नक्की वाचा - "राज्यात मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण करायला हातभार लावू नये", राज ठाकरेंचा शरद पवारांवर निशाणा
राज ठाकरे काय म्हणाले?
मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या प्रमुख शहरांमध्ये जो अधिकचा खर्च होताय तो मुळच्या लोकसंख्येसाठी होत नाही. बाहेरून आलेल्या लोकांसाठी हा पैसा खर्च होत आहे. म्हणजे आपला सर्वाधिक पैसा बाहेरच्या लोकांसाठी खर्च होतोय. ठाणे जिल्ह्यात 7-8 महापालिका आहे. म्हणजे एका जिल्ह्यात एवढ्या महापालिका असतील तर ही लोकसंख्या ठाण्यातील लोकांनी वाढवली का? बाहेरुन येणाऱ्या लोकांचा लोंढा किती मोठ्या प्रमाणात आहे हे यावरुन दिसते. मग बाहेरुन आलेल्या लोकांची व्यवस्था करण्यासाठीच सरकारचा पैसा खर्च होत आहे. त्यामुळे इथे शेतकरी आत्महत्या करतायेत पण त्यांना पैसे देता येत नाहीत.
(नक्की वाचा - त्याला शोधण्याचा प्रयत्न केला पण..., फडणवीसांचं ट्विट; महिनाभरानंतर सिद्धांतचा मृतदेह सापडला!)
रोजगाराच्या संधी इथे उपलब्ध होत आहेत, मात्र महाराष्ट्राच्या तरुणांना त्या मिळत नाहीत. बाहेरच्या राज्यांमधून मुलं येतात आपल्या नोकऱ्या बळकावतात. आपल्या राज्यातील शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेतात, आपल्या मुलामुलींना ते मिळत नाही याचा आपण विचार केला पाहिजे. या शिक्षण संस्थांमध्ये बाहेरच्या विद्यार्थ्यांना का शिक्षण मिळते? आरक्षणाचे राजकारण करणाऱ्यांना निवडणुकीत जनतेने दूर ठेवले पाहिजे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.