उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis tweet) यांनी ट्विट करून सिद्धांत विठ्ठल पाटील यांच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. अमेरिकेतील मोंटेना येथील ग्लॅशिअर नॅशनल पार्कात बेपत्ता झालेल्या सिद्धांतचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू होते, मात्र त्याचा जीव वाचविण्यात यश आलं नसल्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी दु:ख व्यक्त केलं.
साधारण महिनाभरापूर्वी सिद्धांत पाटील हा अमेरिकेतील मोंटेना येथील ग्लॅशिअर नॅशनल पार्कातून बेपत्ता झाला होता. तो सिद्धार्थ कॅलिफॉर्नियामध्ये काम करीत होता. 6 जुलै रोजी ट्रेकिंगसाठी तो एव्हलान्च लेकजवळील एका डोंगराजवळ गेला होता. यावेळी एका दगडावर उभा असताना तो थेट दरीमधील नदीत कोसळला.
नक्की वाचा - ...तर यशश्री वाचली असती? 'त्या' आदेशाकडे दुर्लक्ष करणं महागात पडलं
तो नदीत कोसळताना त्याच्या मित्रांनी त्याला पाहिलं. पडल्यानंतर तो एकदा पाण्यातून वर आला, परंतू पाण्याला वेग असल्याने तो वाहून गेला. त्यानंतर साधारण महिनाभरापासून त्याच्या मृतदेहाचा शोध घेतला जात होता. अखेर सिद्धांतचा मृतदेह सापडला आहे. ग्लॅशिअर नॅशनल पार्क यांनी यासंदर्भातील परिपत्रक जारी केलं आहे. डीएनए चाचण्या आणि दातांच्या रचनेच्या आधारे हा मृतदेह सिद्धांतचाच असल्याचं निश्चित करण्यात आलं आहे.
Deeply saddened to hear about the tragic loss of Siddhant Vitthal Patil, a young tech professional. Siddhant went missing while hiking at Avalanche Creek in California. Despite our relentless efforts with the respective MEA authorities to understand the situation and expedite the…
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 4, 2024
याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे. त्याला शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र सापडू शकला नाही म्हणत त्यांनी सिद्धांतच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world