जाहिरात

प्रकाश आंबेडकरांचा रुग्णालयातून नागरिकांना संदेश; काय म्हणाले?

Prakash Ambedkar News : प्रकाश आंबेडकर याच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. रुग्णालयातून प्रकाश आंबेडकर यांना आज कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधला.

प्रकाश आंबेडकरांचा रुग्णालयातून नागरिकांना संदेश; काय म्हणाले?

Prakash Ambedkar hospitalized : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना 31 ऑक्टोबर रोजी हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर तातडीने त्यांची अँजिओग्राफी करण्यात आली. अँजिओग्राफीमध्ये त्यांच्या हृदयाच्या धमनीत ब्लॉकेज असल्याचं आढळून आलंय, त्यावर आज 1 नोव्हेंबर रोजी उपचार केले जाणार आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

प्रकाश आंबेडकर याच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. रुग्णालयातून प्रकाश आंबेडकर यांना आज कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधला. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं की, मी सध्या आयसीयूमध्ये आहे. अँजीओग्राफी आणि अँजीओप्लास्टी दोन्ही झालेले आहे. डॉक्टरांनी निरीक्षणाखाली ठेवले आहे.

(नक्की वाचा - पवार कुटुंबात दुरावा वाढला? ऐन दिवाळीत बारामतीत काय झालं?)

निवडणुकीला सुद्धा सुरुवात झाली आहे. ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. ओबीसींसाठी सुद्धा महत्वाची आहे. कारण विधानसभेनंतर ओबीसी आरक्षण थांबवले जाणार आहे. आपले आमदार निवडून आले, तर आरक्षणावरून हल्ला आपल्याला थांबवता येणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना आपले बहुमूल्य मत देऊन विजयी करा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

 नक्की वाचा  - लोकसभेला ताई, विधानसभेला दादा!अजित पवारांचं ते वक्तव्य पुन्हा चर्चेत का?)

ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, दुसऱ्या बाजूस एससी, एसटी, ओबीसी आरक्षण वाचवण्याची ही अस्तित्वाची लढाई आहे. एससी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची अंमलबजावणी होणार आहे. या निवडणुकीत आपली सगळ्यांची जबाबदारी महत्वाची आहे. विधानसभेत आमदार निवडून आले, तर आरक्षणावरील हल्ला थांबवता येतो. आपण वंचित बहुजन आघाडीच्या गॅस सिलेंडरमागे उभे रहा, अशी सादही आंबेडकरांनी कार्यकर्त्यांना, उमेदवारांना आणि आरक्षणवादी जनतेला घातली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com