जाहिरात

लोकसभेला ताई, विधानसभेला दादा!अजित पवारांचं ते वक्तव्य पुन्हा चर्चेत का?

बारामतीच्या आखाड्यात पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार हा सामना रंगणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारां विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे युगेंद्र पवार मैदानात आहेत.

लोकसभेला ताई, विधानसभेला दादा!अजित पवारांचं ते वक्तव्य पुन्हा चर्चेत का?
पुणे:

देवा राखुंडे

विधानसभा निवडणुकीत आता रंग भरू लागले आहेत. उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे. आत ऐन दिवाळीच प्रचाराचा बार उडवला जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारही त्यात कुठे मागे नाहीत. ते आपल्या होमपिचवर मतदारांना निवडून देण्याचे आवाहन करत आहेत. दिवाळीच्या दिवशीही त्यांनी बारामतीकरांना आपल्याला पुन्हा एकदा निवडून देण्याचे आवाहन केलं आहे. यावेळी त्यांनी लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा हे बारामतीकरांनी ठरवलं आहे याची आठवण करून दिली आहे. त्याचा उल्लेख त्यांनी परत एकदा केला आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बारामतीच्या आखाड्यात पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार हा सामना रंगणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारां विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे युगेंद्र पवार मैदानात आहेत. त्यामुळे नेहमीच बारामतीची एकतर्फी होणारी ही लढत या वेळी मात्र चुरशीची होणार आहे. लोकसभेला अजित पवारांना बारामतीकरांनी धोबीपछाड दिला होता. बारामती विधानसभा मतदार संघातूनही सुप्रिया सुळेंना मताधिक्य मिळाले होते. त्यामुळेच अजित पवारांना दिसते तेवढी सोपी लढाई निश्चितच नाही. शिवाय शरद पवारही अजित पवारांना धडा शिकवण्यासाठी सरसावले आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - मनसेच्या उमेदवाराची प्रतिस्पर्ध्यासोबत सिक्रेट मिटींग, मनसेच्याच नेत्याने बाहेर काढला फोटो

या सर्वाची चांगलीच कल्पना अजित पवारांना आहे. त्यामुळे ते प्रत्येक पाऊल हे सावध पणे टाकत आहेत. दिवाळी निमित्त त्यांनी बारामतीकरांना शुभेच्छा दिल्या. शिवाय लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा असं मतदारांनी ठरवलं होतं, असं विधान त्यांनी पुन्हा एकदा केलं आहे. काहींनी ठरवलं होतं की, लोकसभेला ताईंना निवडून द्यायचं आणि विधानसभेला दादाला. त्याबद्दल आता जास्त बोलणार नाही असे ही ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - प्रकाश आंबेडकरांना हृदयविकाराचा झटका का आला? आज तातडीने होणार शस्त्रक्रिया 

एकीकडे आपल्याला संधी दिव्या असे अजित पवार सांगत होते. तर दुसरीकडे बारामतीसाठी आपण काय काय केलं हे सांगायला ते विसरले नाही. मागच्या वेळी पहिल्या नंबरच्या मताधिक्क्याने तुम्ही विधानसभेत पाठवलं होतं. त्यामुळे मी पहिल्या नंबरचा निधी बारामतीसाठी आणला होता असं अजित पवारांनी सांगितलं. बारामतीत 9 हजार कोटींचा निधी देण्याचं काम केलं. यावेळीही विधानसभेत चांगल्या मताधिक्क्यांने संधी द्या”, असं आवाहन अजित पवारांनी यावेळी केलं.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: