जाहिरात

पवार कुटुंबात दुरावा वाढला? ऐन दिवाळीत बारामतीत काय झालं?

अजित पवारां विरूद्ध युगेंद्र पवार हे मैदानात आहेत. त्यामुळे पुन्हा एकत्र आलो तर त्यातून मतदारांत वेगळा संदेश जाईल त्यामुळे जाणीव पूर्वी पवार कुटुंब वेगवेगळा पाडवा तर साजरा करत नाही ना? असाही प्रश्न निर्माण होत आहे.

पवार कुटुंबात दुरावा वाढला? ऐन दिवाळीत बारामतीत काय झालं?
पुणे:

देवा राखुंडे

बारामतीच्या गोविंदबागेतील पवारांचा पाडवा हा सध्या राजकीय वर्तुळातील चर्चेचा विषय झालाय. पक्ष आणि कुटुंबात फूट पडल्यानंतर आता पवारांच्या पाडव्यामध्येही फूट पडलीय. शरद पवारांचा पाडवा गोविंदबागेत तर अजित पवारांचा पाडवा काटेवाडीत साजरा होणार आहे. त्यामुळे नात्यानंतर आता सणातही फूट पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पवार कुटुंबात कुटता वाढत आहे का ? याची चर्चा बारामतीत सुरू आहे.  

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पवारांची ही दुसरी दिवाळी आहे. दरवर्षी पाडव्याच्या दिवाशी बारामतीतील गोविंदबागेत पवार कुटुंब एकत्र येतं. या कार्यक्रमाला प्रामुख्यानं शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे आलेल्या नागरिकांच्या शुभेच्छा स्विकारतात. यंदाच्या गोविंदबागेतील पाडव्याला अजित पवार उपस्थित राहणार की नाही? याबाबत साशंकता होती. मात्र आता अजित पवारांनी आपला पाडवा काटेवाडीतील निवासस्थानी स्वतंत्र साजरा करायचं ठरवलं आहे. 

ट्रेडिंग बातमी - लोकसभेला ताई, विधानसभेला दादा!अजित पवारांचं ते वक्तव्य पुन्हा चर्चेत का?

दिवाळीचा पाडवा संपूर्ण पवार कुटुंब बारामतीकरांसोबत साजरा करत आलं आहे. असा आजपर्यंतचा इतिहास आहे. सध्या बारामतीचं राजकारण तापलं असून बातामतीत काका विरुध्द पुतण्या संघर्ष पहायला मिळत आहे.अशातच दादांनी वेगळी भुमिका घेतलीय. मात्र याबद्दल आपल्याला काही माहिती नसल्याचं सुप्रिया सुळेंच म्हणणं आहे. त्यामुळे नात्यात आणखी दुरावा झाल्याचं बोललं जात आहे. 

ट्रेंडिंग बातमी - मनसेच्या उमेदवाराची प्रतिस्पर्ध्यासोबत सिक्रेट मिटींग, मनसेच्याच नेत्याने बाहेर काढला फोटो

दोन दिवसापूर्वीच अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी दिवाळीच्या पाडव्याला चार-पाच व्यक्ती सोडले तर काही फरक पडणार नाही. प्रचार सुरू आहे. त्यामुळे शरद पवार, सुप्रिया सुळे, युगेंद्र प्रचारात असतील असं श्रीनिवास पवार म्हणाले. शिवाय अजित पवार देखील प्रचारात असतील. त्यांचं येणं कमी होईल. पण एकदम बंद होणार नाही.असं ही श्रीनिवास पवार यांनी स्पष्ट केलं होतं. 

ट्रेंडिंग बातमी - प्रकाश आंबेडकरांना हृदयविकाराचा झटका का आला? आज तातडीने होणार शस्त्रक्रिया 

यंदा बारामतीत पवार कुटुंबाचे दोन पाडवे  होणार आहेत.याआधी फक्त शरद पवार गोविंद बागेमध्ये पाडवा घ्यायचे. परंतु अजित पवार काटेवाडीमध्ये पाडव्याच्या निमित्ताने नागरिकांना भेटणार आहेत. शरद पवारांचा दिवाळी पाडवा हा गोविंद बागेत होईल. तर अजित पवारांचा पाडवा हा काटेवाडीत होणार आहे हे आता जवळपास स्पष्ट झालं आहे. बारामतीत यंदा दोन्ही पवारांचा पाडवा वेगळा होणार आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. त्यात अजित पवारां विरूद्ध युगेंद्र पवार हे मैदानात आहेत. त्यामुळे पुन्हा एकत्र आलो तर त्यातून मतदारांत वेगळा संदेश जाईल त्यामुळे जाणीव पूर्वी पवार कुटुंब वेगवेगळा पाडवा तर साजरा करत नाही ना? असाही प्रश्न निर्माण होत आहे.