Pratibha Pawar Viral Video: 28 जानेवारी 2026... ही तारीख कोणीही विसरू शकणार नाही. या तारखेला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. बारामतीकर तर हा दिवस त्यांच्यासाठी काळा दिवस असल्याचे म्हणत आहेत. मुंबईहून बारामतीच्या दिशेने प्रवास करत असताना अजित पवारांचे विमान कोसळले आणि स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडलीय. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. 29 जानेवारी 2026 रोजी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान कॉलेजच्या प्रांगणात अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी राज्यासह देशातील मोठ्या राजकारण्यांसह सर्वसामान्यांनीही मोठी गर्दी केली होती. अंत्यसंस्काराशी संबंधित कित्येक भावुक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे व्हिडीओ पाहून कोणालाही रडू कोसळले.
(नक्की वाचा: Ajit Pawar Death News: अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीकर हादरले! मनात मोठी भीती, चिंता आणि अस्वस्थता)
अजित पवारांच्या अंत्यसंस्कारावेळी नेमकं काय घडलं? | Ajit Pawar Funeral Viral Video
पण सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी तीव्र संताप करत आहेत. राशपचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी प्रतिमा पवार यांच्याशी संबंधित हा व्हिडीओ आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये अजित पवार यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी प्रतिमा पवार हसताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. यावरून नेटकरी प्रतिमा पवार यांच्यावर जोरदार टीका करताना दिसत आहेत.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अंत्यसंस्काराचा गंभीर आणि भावनिक प्रसंग सुरू असताना प्रतिमा पवार (Pratibha Pawar Viral Video) काही क्षण हसताना दिसत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओची NDTV पुष्टी करत नाही.
प्रतिभा पवार (Pratibha Pawar Viral Video) यांना अजित पवारांच्या अंत्यसंस्काराच्या वेळेस हसताना पाहून नेटकऱ्यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केलाय. नेटकऱ्यांनी नेमकं काय म्हटलं, जाणून घेऊया...
नेटकरी प्रतिभा पवार यांच्यावर भडकले | Netizens Are Angry Sharad Pawar Wife Pratibha Pawar
ganeshchaudhari178 ने म्हटलंय की, "गेला तो पुतण्या होता पोरगा नाही".
d.mane_patil_007 या युजरने लिहिलंय की, "पवार घराणे सोडून पूर्ण महाराष्ट्र दुःखात आहे".
"खरोखर रडली ती गोरगरिब जनता रक्ताची नाती नाही", अशी कमेंट sj79871 या युजरने केलीय.
dhananjay_sonawane_777 नावाच्या युजरने लिहिलंय की, "राजकारणी लोक आहेत ते आपण जास्त विचार नाही करायचा....गरिबाला जाणीव असते आपल्या जवळच गेल तर"
makarand.k2727ने म्हटलंय की, "हे पाहून पवार कुटुंबातील 70 % लोकांना दुःख झाले असे वाटत नाही."
Photo Credit: Social Media
Ajit Pawar Funeral | खासदार Supriya Sule पुन्हा ट्रोलर्सच्या टार्गेटवर? | NDTV मराठी