मान्सूनपूर्व पावसाने कोकणाला झोडपलं, आंबा उत्पादकांचं टेन्शन वाढलं; IMD कडून अलर्ट

गेल्या आठवड्यापासून तळकोकणासह अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे आंबा उत्पादकांचं टेन्शन वाढलं आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

देशभरात मान्सूनची प्रतीक्षा आहे. भारतीय हवामान विभागानुसार, देशात 31 मेच्या जवळपास मान्सून केरळमध्ये प्रवेश करेल. यादरम्यान महाराष्ट्रातील कोकणात मान्सूनपूर्व पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या आठवड्यापासून तळकोकणासह अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे आंबा उत्पादकांचं टेन्शन वाढलं आहे. राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस सुरू आहे. महाराष्ट्र हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या काही तासात काही ठिकाणांवर मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. अहमदनगर, जळगाव, नाशिक, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, रायगढ, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

भारतीय हवामानाच्या अंदाजानुसार, दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ जिल्ह्याच्या विविध ठिकाणांवर ढगांच्या कडकडाटासह मध्यम पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. अंदमान निकोबार बेटावर प्रवेश केल्यानंतर मान्सून पुढे सरकत आहे. येत्या 24 तासात दक्षिण-पूर्व अरब समुद्रासह मालदीवमधील काही भागात दिसून येऊ शकतो. दक्षिण बंगालची खाडी, अंदमान आणि निकोबार बेटावरील काही भागात दक्षिण-पश्चिम मान्सून पुढे येत अस असल्याने अनेक राज्यात पावसाची परिस्थिती आहे. 

कोकणात मान्सूनपूर्व पाऊस...
मान्सूनपूर्व पावसामुळे कोकणातील ग्रामीण भागातील जवनीवन काही प्रमाणात विस्कळीत होत आहे. मान्सून पुढील दोन दिवसात अरबी समुद्रात प्रवेश करेल. तळ कोकणात जवळपास सर्वच ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होत आहे. कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, वैभववाडी या भागात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. 

नक्की वाचा - आनंदाची बातमी! दक्षिण अंदमानात मान्सून धडकला, महाराष्ट्रात कधी येणार?

तळ कोकणात गेले आठ दिवस सतत मान्सून पूर्व पाऊस कोसळत आहे. यामुळे जिल्ह्यातील आंबा आणि जांभूळ पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मुळात यावर्षी जांभूळ पीक अत्यल्प प्रमाणात आलं होत. त्यात मान्सून पूर्व पावसाने जांभूळ पीक शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोकणातील सर्वात मोठ्या जांभूळ बाजारपेठेत जांभूळ विक्रीचं प्रमाण कमी झालं आहे. त्यामुळे जांभूळ पीक मान्सून पूर्व पावसामुळे अडचणीत आले आहेत. 

Advertisement

जळगावात सर्वाधिक तापमान...
पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात पुढील दोन ते तीन दिवस आकाश स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. राज्यात सर्वाधिक तापमान जळगावात नोंदवण्यात आलं आहे. येथे 44 हून जास्त सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. आजही येथे तापमान जास्त असण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.