अखेर सर्वांनाच प्रतीक्षा असलेला मान्सून दक्षिण अंदमानात दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाकडून याबाबत अपडेट देण्यात आली आहे. 31 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षीदेखील मान्सून 19 मे रोजी अंदमान-निकोबारमध्ये धडकला होता. मात्र केरळमध्ये 9 दिवस उशिराने 8 जूनला पोहोचला होता. मात्र यंदा मान्सून 31 मे रोजी केरळमध्ये दाखल होऊ शकतो. मान्सून 9 ते 16 जूनदरम्यान महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - निवडणुकीत 4 हजार कोटींचे ड्रग्ज जप्त, गुजरातमधून सर्वाधिक, महाराष्ट्रातून किती?
मान्सून हा केरळमध्ये साधारण पणे 1 जून ला दाखल होतो. पण यावर्षी मान्सून एक दिवस आधीच केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. असं असलं तरी तिन चार दिवस मागे पुढेही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 28 मे ते 3 जून दरम्यान मान्सून भारतात असेल. केरळमध्ये प्रवेश करण्यापूर्वी मान्सून अंदमान निकोबार बेटांवर येतो. दरवर्षाचा विचार करता अंदमान बेटावर तो 21 मे ला दाखल होत असतो. पण यावेळी तो दोन दिवस आधीच येणार आहे. गेल्यावर्षीही मान्सून अंदमानमध्ये 19 मे ला आला होता. पण केरळमध्ये नऊ दिवस उशिराने आला. दरम्यान ला निनामुळे चांगला पाऊस होण्याची अपेक्षा आहे.
हेही वाचा - कोकण रेल्वेवर अडीच तासांचा मेगाब्लॉक, कधी आणि केव्हा, किती गाड्यांवर परिणाम?
महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यास गेल्यावर्षी उशिर झाला होता. यावेळी मान्सून 11 जूनला महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज आहे. राज्यात गेल्या काही दिवसापासून उकाडा वाढला आहे. त्यामुळे मान्सूनच्या आगमनाची सर्वच जण आतूरतेने वाट पाहत आहेत. पाऊस आल्यास नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world