
रेवती हिंगवे, पुणे
Pune Crime News : पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली देह व्यापार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे पोलिसांनी या ठिकाणी छापेमारी करत 18 मुलींची सुटका केली आहे. पोलिसांनी कारवाईत सुटका करण्यात आलेल्या 18 मुलींपैकी 10 पेक्षा अधिक मुली परदेशी नागरिक आहेत. पुण्यातील उच्चभ्रू बाणेर आणि विमानतळ भागात पोलिसांची ही कारवाई केली आहे.
पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्याव्यवसायावर पोलिसांची धडक कारवाई केली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, परिमंडळ 4 अंतर्गत येणाऱ्या पुण्यातील बाणेर आणि विमानतळ परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या मसाज सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे.
(नक्की वाचा- Sangli News : दहावीतील विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या; लैंगिक अत्याचारानंतर उचललं टोकाचं पाऊल)
विमानतळ परिसरात असलेल्या स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातून एकूण 16 मुलींची सुटका करण्यात आली आहे. या 16 मुलींपैकी 10 परदेशी आणि 2 भारतीय आहेत. या स्पा सेंटरच्या जागा मालकासह, स्पा सेंटर मालक आणि मॅनेजर यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
(नक्की वाचा - 300 जणांची गर्दी, रात्री 1 वा. पंचायत अन् मृत्यूची घोषणा; चेटकीणीच्या संशयातून कुटुंबातील 5 जणांना जिवंत जाळलं)
दुसऱ्या कारवाईत, उच्चभ्रू अशी ओळख असलेल्या बाणेरमध्ये सुद्धा पोलिसांनी कारवाई करत एका स्पा सेंटरवर छापा टाकला. या कारवाईत 2 मुलींची सुटका करण्यात आली आहे. या स्पा सेंटरच्या मालकावर तसेच स्पा चालवणाऱ्या मॅनेजरवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात आणि बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world