रेवती हिंगवे, पुणे
पुण्यातून अपघाताची एक विचित्र घटना समोर आली आहे. दोन बाईक समोरासमोर धडकल्यामुळे चौघेजण जखमी झाले आहेत. त्यातील एकजण गंभीर जखमी झाला असून चौघांवर वेगवेगळ्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.फटाक्यांच्या धुरामुळे दृश्यमानता कमी झाल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
(नक्की वाचा- 'क्लिन बोल्ड डिपॉझिट गुल' पहिल्याच सभेत मुख्यमंत्र्यांची जोरदार फटकेबाजी)
उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. दिवाळीत काही मुले रस्त्यावर फटाके वाजवत होते.फटाक्यांमुळे संपूर्ण रस्त्यावर धूर झाला होता. समोरचं काही दिसत नसल्याने हा अपघात झाला असावा. तसेच दोन्हीही बाईक वेगाने होत्या. चक्रधर कांचन, क्षितिज जाधव, सिद्धांत सातव आणि प्रतीक संतोष साठे अशी अपघातात जखमी झालेल्या चौघांची नावे आहेत.
(नक्की वाचा- उत्तरखंडमध्ये बस दरीत कोसळून भीषण अपघात, 45 प्रवाशांसह बस दरीत कोसळली)
एका दुकानाचे उद्घाटन सुरू होते, त्यावेळी ही घटना घडली आहे. एक व्यक्ती फटाक्यांचा व्हिडीओ काढत असताना ही अपघाताची घटना कॅमेऱ्यात कैद झाली. पोलीस या प्रकरणी कुणावर कारवाई करणार हे पाहावं लागेल.