जाहिरात

'क्लिन बोल्ड डिपॉझिट गुल' पहिल्याच सभेत मुख्यमंत्र्यांची जोरदार फटकेबाजी

कुर्ला विधानसभा मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार मंगेश कुडाळकर यांच्यासाठी पहिली प्रचार सभा घेतली.

'क्लिन बोल्ड डिपॉझिट गुल' पहिल्याच सभेत मुख्यमंत्र्यांची जोरदार फटकेबाजी
मुंबई:

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीची पहिलीच प्रचार सभा गाजवली आहे. त्यांनी या सभेत चौकार षटकार ठोकर समोरच्या उमेदवाराला क्लिन बोल्ड करण्याचा निर्धार केला. क्लिन बोल्ड डिपॉझिट गुल अशी नवी घोषणाच यावेळी त्यांनी दिली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष पणे टिका करत त्यांचे सरकार हे हफ्ते घेणारे सरकार होते आमचे सरकार हे लाडक्या बहीणांनी हाफ्ते देणारे सरकार आहे असे त्यांनी सांगितले. पहिल्याच प्रचार सभेतून शिंदे यांनी निवडणूक प्रचाराचा लाडकी बहीण योजनाच केंद्रस्थानी असेल हेच पहिल्या सभेतून दाखवून दिले आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कुर्ला विधानसभा मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार मंगेश कुडाळकर यांच्यासाठी पहिली प्रचार सभा घेतली. या सभेत त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. काही लोकांकडे लवंगी आहे पण 23 तारखेला आम्ही अॅटमबॉम्ब फोडणार असे शिंदे यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेचा आवर्जून उल्लेख केला. आजा भाऊबीज दिवाळीलाच नाही तर दर महिन्याला मिळणार आहे असे ते म्हणाले. ज्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत त्यांच्या खात्यातही पैसे जमा होणार आहेत असेही त्यांनी सांगितले. निवडणूक झाल्यानंतर डिसेंबर महिन्याचे पैसेही जमा होतील असे ते म्हणाले. विरोधक ही योजना बंद करण्याचं बोलत आहेत. जे या योजनेत रोडा टाकण्याचं काम करत आहेत त्यांना या निवडणुकीत जोडा दाखवा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. 

ट्रेंडिंग बातमी - पालघरमध्ये चाललंय काय? एका मागोमाग नेते का होत आहेत गायब?

या योजनेची चौकशी करणार असे विरोधक बोलत आहे. ही योजना बंद करून तुमच्या लाडक्या भावाला जेलमध्ये टाकण्याचे बोलत आहेत. तुम्ही तुमच्या लाडक्या भावाला जेलमध्ये पाठवणार आहात का असा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी यावेळी उपस्थित महिलांना विचारला. जर माझ्या लाडक्या बहीणींना पैसे देणे हा गुन्हा असेल तर असा गुन्हा मी वारंवार करणार असेही शिंदे यावेळी म्हणाले. आम्ही देणारे लोक आहोत. आम्ही तुमच्या खात्यात हाफ्ते भरतो. पण ठाकरेंच्या काळाच हाफ्ते घेतले जात होते असे शिंदे यावेळी म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - मनोज जरांगे आज भूमिका जाहीर करणार, कुठे आणि किती उमेदवार देणार? बैठकीआधी दिले संकेत

यावेळी शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष केले. काही लोक फक्त फेसबूक लाईव्ह करत होते. पण आम्ही फेस टू फेस काम करणारे आहोत. लाडकी बहीण योजनेत आम्ही आणखी वाढ करणार आहोत असेही ही शिंदे यावेळी म्हणाले. त्यामुळे विरोधकांची बोलती बंद झाली आहे. महिलांना आम्हाला लखपती करायचं आहे. सुरक्षित ही ठेवायचं आहे. अडीच वर्षात येवढं काम केलं आहे. मग पुढच्या पाच वर्षात किती काम करू याचा विचार तुम्ही करा असेही ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - मुख्यमंत्र्यांबाबतच्या 'त्या' वक्तव्यावरून वाद पेटला, भाजप- शिंदे सेना आमने-सामने

लाडकी बहीण योजनेची विरोध चेष्ठा करत आहेत. त्यांना जोरदार उत्तर वीस तारखेला द्या. हे सरकार सर्व जातीपातीचं आणि गरिबांचं सरकार आहे. त्यामुळे जे विरोधत तुमच्याकडे मत मागायला येतील त्यांना लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी कोर्टात का गेलाय हे नक्की विचारा. त्यामुळे तुम्ही आता या लाडक्या भावाची काळजी घेणार की नाही असा प्रश्न शिंदे यांनी केला. तुम्ही तुमच्या लाडक्या भावाला जेलमध्ये पाठवणार का? असेही त्यांनी विचारले. जे सावत्र भाऊ आहेत त्यांच्या पासून सावध राहा. महायुतीचे सरकार पुन्हा आणा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.