पुणे बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरण; पोलिसांकडून दोन आरोपींचे स्केच जारी

बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोन संशयित आरोपींचं स्केच पोलिसांना जारी केले आहेत. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे विविध पथक आरोपींचा शोध घेत आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

रेवती हिंगवे, पुणे 

पुण्यातील बोपदेव घाटात 21 वर्षाय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पीडित तरुणी मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला गेली होती. मात्र अत्याचार करणारे कोण होते याचा तपास अद्याप लागू शकलेला नाही. पोलिसांना पीडित तरुणी आणि तिच्या मित्राने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपींच स्केच जारी केले आहेत.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोन संशयित आरोपींचं स्केच पोलिसांना जारी केले आहेत. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे विविध पथक आरोपींचा शोध घेत आहेत. तसेच जवळचे सर्व सीसीटीव्ही पोलिसांकडून तपासण्यात येत आहेत. 

Bopdev Ghat Case

(नक्की वाचा- मित्राबरोबर घाटात फिरायला गेली अन् घात झाला, पुण्यात 21 वर्षीय तरुणी बरोबर भयंकर घडलं)

पीडित 21 वर्षीय तरूणी तिच्या मित्रासोबत बोपदेव घाटात रात्री 11 वाजता फिरायला गेली होती. ते ज्या ठिकाणी तो परिसर अगदी निर्जन परिसर होता. याचाच गैरफायदा तीन अज्ञान आरोपींनी घेतला. तिघांनी आधी दोघांनाही दमदाटी केली, त्यांना भिती दाखवली . त्यानंतर तिघांनीही तरुणीवर अत्याचार केले. त्यानंतर तिघेही तिथून पसार झाले. 

(नक्की वाचा -शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा वारंवार पाठलाग, विनयभंग अन् पुढे...)

घटनेनंतर पीडित तरुणी आणि तिचा मित्र हादरून गेले. त्यांनी तातडीने कोंढवा पोलिस स्टेशन गाठले. त्यांच्या बरोबर घडलेला प्रकार त्यांनी पोलिसांना सांगितला. पोलिसांना तातडीने गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. क्राईम ब्रँच आणि कोंढवा पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पुणे क्राईम ब्रँचने 10 पथके तयार केली आहेत. 

Advertisement

Topics mentioned in this article