पुणे हादरले! प्रसिद्ध लेखक डॉ संपत जाधव यांना पिस्तुल दाखवून हल्ल्याचा प्रयत्न, मातंग समाजाच्या बैठकीनंतर राडा

Pune Breaking: पुण्यातील स्वारगेट परिसरात सुप्रसिद्ध लेखक डॉ. संपत गणपत जाधव यांच्यावर पिस्तुल रोखून प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची घटना समो आली आहे. या बैठकीनंतर घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडालीय, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Dr. Sampat Ganpat Jadhav Attacked Pune : प्रसिद्ध लेखक डॉ. संपत जाधव यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न"
NDTV Marathi

- यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी

Pune Breaking: पुण्यातील स्वारगेट परिसरात एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. सुप्रसिद्ध लेखक आणि विचारवंत डॉ. संपत गणपत जाधव यांच्यावर पिस्तुल रोखून मारहाण करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. अण्णाभाऊ साठे चौकातील सर्कलजवळ घडलेल्या या प्रकारामुळे साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात संतापाची लाट पसरली आहे.

डॉ. संपत जाधव यांना मारहाण करण्याचा प्रयत्न कोणी केला? 

मिळालेल्या माहितीनुसार, मातंग समाजाच्या आरक्षण संदर्भातील एक महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. ही बैठक संपल्यानंतर डॉ. संपत गणपत जाधव हे अण्णाभाऊ साठे चौकाजवळ थांबले होते. यावेळी अचानक सहदेव डावरे, प्रवीण शेलार, प्रमोद नाडे, स्वप्नील सोनवणे आणि ओंकार हिंगे या लोकांनी डॉ. जाधव यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.

Advertisement

(नक्की वाचा: Pune News: तोरणा किल्ल्यावर मुंबईच्या पर्यटकासोबत अंधारात भयंकर घडलं! काळजाचा ठोका चुकवणारी घटना)

परिसरात भीतीचे वातावरण

आरोपींनी डॉ. जाधव यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी हे भांडण सोडवण्यासाठी दीपक कसबे यांनी मध्यस्थी केली असता आरोपींनी त्यांनाही मारहाण केली आणि त्यांच्या कानाखाली लगावली. प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही, बाजूला उभ्या असलेल्या गाडीतून तीन ते चार जण खाली उतरले. तर यापैकी एका आरोपीने पिस्तुल काढली. "बंदूक इकडे दे," असे ओरडत त्याने ती पिस्तुल दीपक कसबे यांच्या डोक्यात मारली. यावेळी आरोपी दारूच्या नशेत असल्याची माहिती समोर आली आहे. दारूच्या नशेत 'डोक्यात गोळ्या घाला' असे म्हणत चिथावणी दिली. जीव वाचवण्यासाठी दीपक कसबे यांनी तिथून पळ काढला.

(नक्की वाचा: Pune News: पुण्यात मृत व्यक्तीच्या नावे कोट्याधींची मालमत्ता हडपली, मास्टरमाईंडसह अख्खी टोळी खाणार जेलची हवा )

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित आरोपींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. या गंभीर प्रकारामुळे आता पोलीस प्रशासन काय पाऊल उचलते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.