जाहिरात

Pune News : पुण्यातील 'या' गॅस एजन्सीचा पुरवठा आणि वितरण बंद, जिल्हा प्रशासनाची मोठी कारवाई, कारण काय?

पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिलेल्या आदेशानुसार हिंजवडी येथील मे. श्री लक्ष्मी भारतगॅस या गॅस एजन्सीला व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा पुरवठा व वितरण तात्काळ प्रभावाने बंद करण्यात आला आहे. 

Pune News : पुण्यातील 'या' गॅस एजन्सीचा पुरवठा आणि वितरण बंद, जिल्हा प्रशासनाची मोठी कारवाई, कारण काय?
Pune LPG Gas Agency Update
पुणे:

Pune LPG Gas Cylinder Update :  पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिलेल्या आदेशानुसार हिंजवडी येथील मे. श्री लक्ष्मी भारतगॅस या गॅस एजन्सीला व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा पुरवठा व वितरण तात्काळ प्रभावाने बंद करण्यात आला आहे. जिल्हा पुरवठा शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार, या एजन्सीकडे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) मार्फत व्यावसायिक एलपीजी सिलेंडर विक्रीचा अधिकृत परवाना आहे.

अनधिकृत व नोंदणी नसलेल्या व्यक्तींना सिलेंडर वाटप

मात्र, 26 मार्च 2026 रोजी सिलेंडर वितरण करताना शासनाने ठरवून दिलेल्या प्राधान्यक्रमाचे पालन न करता अनधिकृत व नोंदणी नसलेल्या व्यक्तींना सिलेंडर वाटप केल्याचे आढळले. तसेच अधिक नफा मिळविण्याच्या उद्देशाने जादा दराने सिलेंडर विक्री केल्याचेही निदर्शनास आले आहे.

नक्की वाचा >> महाराष्ट्राला लागले आषाढीचे वेध, 'या' तारखेला संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान, वाचा संपूर्ण वेळापत्रक

नागरिकांमध्ये एलपीजी पुरवठ्याबाबत गैरसमज

या प्रकारामुळे नागरिकांमध्ये एलपीजी पुरवठ्याबाबत गैरसमज निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डुडी यांनी तात्काळ कारवाईचे निर्देश दिले.

नक्की वाचा >> Ashok Kharat : खरातचे व्हिडीओ नक्की कोण व्हायरल करतोय? कोणा कोणाचा आहे समावेश? प्रकरणाला आणखी एक धक्कादायक वळण

त्यानुसार संबंधित एजन्सीचा परवाना निलंबित करण्यात येत आहे. तसेच, या आदेशांची तातडीने अंमलबजावणी करून त्याबाबतचा अनुपालन अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) यांना दिले आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com