Pune Crime : पत्नी आणि मेव्हण्याचे मदतीने प्रियकराने केली प्रेयसीची हत्या, 3 वर्षांच्या मुलासोबतही भयंकर कृत्य

Pune Crime : जयश्री मोरे असं खून करण्यात आलेल्या 27 वर्षीय महिलेचं नाव आहे. या प्रकरणी वाकड पोलिसांनी प्रियकर आरोपी दिनेश ठोंबरे, त्याची पत्नी आणि  मेहुणा अविनाश टीळे  यांना अटक केली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

सुरज कसबे, पिंपरी चिंचवड

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची घटना पिंपरी चिंचवडमधील वाकड परिसरात घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे प्रेयसीची हत्या करण्यासाठी प्रियकराला तिच्या पत्नी आणि मेव्हण्याने मदत केलीय. याप्रकरणी पोलिसांनी प्रियकर, त्याला साथ देणारी पत्नी आणि मेहुण्याला वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 

जयश्री मोरे असं खून करण्यात आलेल्या 27 वर्षीय महिलेचं नाव आहे. या प्रकरणी वाकड पोलिसांनी प्रियकर आरोपी दिनेश ठोंबरे, त्याची पत्नी आणि  मेहुणा अविनाश टीळे  यांना अटक केली आहे. 

(नक्की वाचा - बंद खोलीत पायलट तरुणीचा मृतदेह, बॉयफ्रेंडला अटक; अंधेरीत काय घडलं?)

मिळालेल्या माहितीनुसार, 24 नोव्हेंबरच्या  रात्री 10 च्या दरम्यान लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या मयत महिला आणि आरोपी दिनेशमध्ये वाद झाला होता. त्यानंतर आरोपीने तिच्या डोक्यात हातोडीने हल्ला केला. ज्यामध्ये तिचा मृत्यू झाला. 

त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपीने त्याची पत्नी आणि मेहुण्याच्या मदत घेतला. त्यांच्या मदतीने महिलेचा मृतदेह सातारा जिल्ह्यातील खंबाटकी घाटात फेकून दिला आणि दुसऱ्या दिवशी वाकड पोलिसांत आपली प्रेयसी हरवली असल्याची तक्रार दिली. 

Advertisement

(नक्की वाचा - क्रुरतेचा कळस! शेजाऱ्याकडून 9 महिन्याच्या बाळावर कुऱ्हाडीने वार; खळबळजनक घटना)

मुलाला देखील बेवारसपणे सोडलं

धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी मयत महिला आणि दिनेश ठोंबरेच्या तीन वर्षीय मुलाला आळंदीत बेवारस अवस्थेत सोडून दिल्याचं देखील पोलीस तपासात उघडकीस आले आहे. मृत महिला वारंवार पैशांची मागणी करत त्याच्या पहिल्या पत्नीपासून वेगळं राहण्याची मागणी करत  होती. यातूनच महिलेची हत्या केल्याचं आरोपीने पोलीस तपासात सांगितलं. 

Topics mentioned in this article