राहुल कांबळे, नवी मुंबई: क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादातून शेजाऱ्याने नऊन महिन्याच्या चिमुकल्या बाळावर कुऱ्हाडीने वार केल्याची संतापजनक घटना नवी मुंबईमधून समोर आली आहे. नवी मुंबईच्या बेलापूरमध्ये घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गुरुवार (ता.28 नोव्हेंबर) रोजी ही घटना घडली असून फरार आरोपीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कचरा टाकण्यावरुन झालेल्या किरकोळ वादातून शेजाऱ्याने महिलेसह तिच्या नऊ महिन्याच्या चिमुकल्या बाळावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बेलापूर गावाच्या स्मशानभूमीच्या पाठीमागील झोपडपट्टीमध्ये हा प्रकार घडला. कचरा टाकण्यावरुन या दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला होता.
नक्की वाचा: EVM वर भरोसा नाही! माजी मंत्र्यासह 10 बड्या उमेदवारांचे फेर मतमोजणीसाठी अर्ज
याच वादातून एक व्यक्तीने शेजारील महिलेवर आणि त्याच्या 9 महिन्याच्या बाळावर कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात चिमुकला मुलगा गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना काल दिनांक 28 नोव्हेंबर रोजी घडलेली आहे. हल्लेखोर आरोपी फरार असून त्याच्याविरोधात येणाऱ्या सागरी पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल करण्यात आलेले आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, अवघ्या 9 महिन्यांच्या बाळावर कुऱ्हाडीने वार केल्याने परिसरात संतापाची लाट उसळली असून याप्रकरणी आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेनंतर काँग्रेसच्या माजी नगरसेविकांनीही संताप व्यक्त केला आहे. स्थानिक माजी काँग्रेसच्या नगरसेविका पूनम पाटील यांनी बेलापूर गावामध्ये बीट पोलीस चौकीची मागणी केलेली आहे. जेणेकरून अशा प्रकारच्या घटना पुन्हा होणार नाहीत किंवा त्यावर नियंत्रण येईल असे त्यांनी मत व्यक्त केलेले आहे.
महत्वाची बातमी: वक्फ बोर्डाला 10 कोटी, 24 तासात निर्णय रद्द; देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्टीकरण
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world