Pune Police: पुणे पोलिसांची 2 मसाज सेंटरवर धाड; बंद खोलीत सुरु होता भलताच प्रकार   

Pune Crime News: मसाज सेंटर्समध्ये पैशाचे आमिष दाखवून महिलांकडून देहविक्री करून घेतली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत हे रॅकेट उद्ध्वस्त केले.

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune Crime News: पुण्यात स्वारगेट परिसरातील दोन मसाज सेंटर्सवर पोलिसांनी छापा टाकून मोठा पर्दाफाश केला आहे. या ठिकाणी आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या कारवाईतून 5 पीडित महिलांची सुटका केली आहे, तर या गैरकृत्यामध्ये सामील असलेल्या 2 महिलांना अटक करण्यात आली आहे.

मसाज सेंटर्समध्ये पैशाचे आमिष दाखवून महिलांकडून देहविक्री करून घेतली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत हे रॅकेट उद्ध्वस्त केले.

(नक्की वाचा-  Gujarat News: गरब्यादरम्यान 'आय लव्ह मोहम्मद'ची घोषणा; दोन गटात राडा, गाड्यांची जाळपोळ)

पहिल्या कारवाईत पोलिसांनी मार्केट यार्ड परिसरात असलेल्या 'वसुंधरा आयुर्वेदिक मसाज सेंटर'वर छापा टाकला. येथे देहविक्री सुरू असल्याची खात्री झाल्यावर पोलिसांनी कारवाई केली. या ठिकाणाहून पोलिसांनी 4 महिलांची सुटका केली आणि छत्रपती संभाजीनगर येथील एका महिलेला अटक केली आहे.

तर दुसऱ्या कारवाईत मुकुंदनगर भागात 'दिया आयुर्वेदिक मसाज सेंटर' मध्येही वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी एका बनावट ग्राहकाला पाठवून खात्री केली आणि त्यानंतर येथेही छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी एका महिलेची सुटका केली आणि 38 वर्षीय महिलेला अटक केली आहे.

Advertisement

(नक्की वाचा- Delhi Crime: 'माझ्यासोबत चल, विदेशात घेऊन जातो'; दिल्लीतील ढोंगी बाबाचा WhatsApp Chat उघड, 17 मुलींसोबत...)

या दोन्ही कारवाईमुळे पुण्यात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर वचक बसला असून, पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.

Topics mentioned in this article