जाहिरात

Pune PMC Election: धंगेकर विरुद्ध आंदेकर, कोण बाजी मारणार? बिडकरांसमोरही नवख्या प्रणव धंगेकरांचं आव्हान

Pune News: गणेश बिडकर हे नाव सध्या महापौर पदासाठी चर्चेत असून त्यांच्या विरोधात नवखा प्रणव धंगेकर उभा आहे.

Pune PMC Election: धंगेकर विरुद्ध आंदेकर, कोण बाजी मारणार? बिडकरांसमोरही नवख्या प्रणव धंगेकरांचं आव्हान

Pune News: पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कसबा विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापले आहे. येथे निवडणुकीत धंगेकर कुटुंब केंद्रस्थानी आले आहे. प्रभाग क्रमांक 23 आणि 24 मध्ये धंगेकर विरुद्ध विरोधक असा थेट सामना पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे या दोन्ही प्रभागांत कौटुंबिक उमेदवारी आणि पक्षीय संघर्ष यांचे राजकारण ठळकपणे दिसून येत आहे.

धंगेकर विरुद्ध आंदेकर

प्रभाग क्रमांक 24 मध्ये शिवसेनेकडून माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर रिंगणात उतरल्या आहेत. त्यांच्या विरोधात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिवंगत वनराज आंदेकर यांच्या पत्नी सोनाली आंदेकर निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या प्रभागात धंगेकर विरुद्ध आंदेकर असा थेट सामना रंगणार असून सहानुभूती, स्थानिक प्रभाव आणि पक्षीय ताकद यांचा कस लागणार आहे.

(नक्की वाचा-  Holiday on 15 January: 15 जानेवारीला राज्यात सुट्टी जाहीर; कुठे आणि कुणाला मिळणार लाभ?)

दरम्यान, प्रभाग क्रमांक 24 मध्येही धंगेकर कुटुंबाची उपस्थिती लक्षवेधी ठरत आहे. या प्रभागातून भाजपकडून गणेश बिडकर तर शिवसेनेकडून रवींद्र धंगेकर यांचे पुत्र प्रणव धंगेकर मैदानात आहेत. शिवसेना–भाजप युती न झाल्यामुळे येथे थेट लढत होत असून कसबा गणपती, कमला नेहरू आणि केएम हॉस्पिटल परिसरात ही निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे.

एका बाजूला धंगेकर कुटुंबाचा कसबा परिसरातील जनाधार आणि ओळख आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजप व राष्ट्रवादीसारख्या पक्षांची संघटनात्मक ताकद आहे. दोन्ही प्रभागांत महिलांचा आणि तरुण उमेदवारांचा सहभाग असल्याने मतदारांचा कल कोणत्या दिशेने झुकतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुण्यातील या दोन प्रभागांचे निकाल संपूर्ण शहरातील राजकीय समीकरणांवर प्रभाव टाकू शकतात, असे चित्र सध्या तरी दिसून येत आहे.

(नक्की वाचा- TMC Election: 7वी पास कोट्यधीश उमेदवार, दारात गाड्यांचा ताफा; निवडून आल्यास काय करणार? निबंध एकदा पाहाच)

गणेश बिडकरांसमोर नवख्या प्रणव धंगेकरांचं आव्हान

गणेश बिडकर हे नाव सध्या महापौर पदासाठी चर्चेत असून त्यांच्या विरोधात नवखा प्रणव धंगेकर उभा आहे. पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला प्रणव धंगेकर बिडकर वर भारी पडणार का? हे पाहणे औत्सुक्याचं आहे.

सोनाली आंदेकर माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची पत्नी असून सध्या ती जेलमधून निवडणूक लढवणार आहे. आयुष कोमकर हत्येप्रकरणी ती अटकेत आहे. कुतूहलाची गोष्ट ही आहे की गुन्ह्यात अटकेत असून सगळे बँक खाते गोठवण्यात आले आहेत. मग त्यांचा प्रचार करणार कोण आणि पैसे कशा प्रकारे खर्च होणार? अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com