जाहिरात

Pune Crime: गोळीबाराच्या दोन घटनांनी पुणे हादरलं! घोरपडे पेठेत तरुण गंभीर; पोलिसांनी 5 आरोपींना ठोकल्या बेड्या

Pune Crime News: पुण्यातील खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी पूर्ववैमनस्यातून गोळीबाराच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. घोरपडे पेठ येथे झालेल्या गोळीबारात पाठीत गोळी लागल्याने एक तरुण गंभीर जखमी झाला.

Pune Crime: गोळीबाराच्या दोन घटनांनी पुणे हादरलं! घोरपडे पेठेत तरुण गंभीर; पोलिसांनी 5 आरोपींना ठोकल्या बेड्या

अजिंक्य धायगुडे, पुणे

पुण्यातील मध्यवर्ती भाग असलेल्या खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घोरपडे पेठ आणि लोहियानगर परिसरात जुन्या वादातून शुक्रवारी एकाच दिवसात गोळीबाराच्या दोन थरारक घटना घडल्या. या घटनांमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या काही तासांत 5 संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

पहिली घटना: घोरपडे पेठेत पाठीत गोळी लागून तरुण जखमी

पहिली घटना शुक्रवारी सकाळी घोरपडे पेठ पोलिस चौकीजवळ, अनुसया टॉवर्ससमोर घडली. पोलिस उपायुक्त (DCP) ऋषिकेश रावळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ख्वाजाउद्दीन नजीर शेख उर्फ नुरु शेख यांच्या नातेवाइकाने काही वर्षांपूर्वी आरोपीच्या वडिलांना मारहाण केली होती. याच जुन्या वैमनस्याचा राग मनात धरून दुचाकीवरून आलेल्या सुजल उर्फ चिम्या सुनील परदेशी आणि त्याच्या साथीदारांनी नुरु शेख याच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी नुरु शेख याच्या पाठीत थेट लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.

(नक्की वाचा-  VIDEO: मस्ती जिरली! महिला आंदोलकाच्या कानाखाली मारणाऱ्या DCP ला दणका; हायकोर्टाच्या ताशेऱ्यांनंतर कारवाई)

दुसरी घटना: लोहियानगर येथे सुदैवाने तरुण बचावला

दुसरी घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास लोहियानगर भागात घडली. जुन्या वादातून तीन हल्लेखोरांनी ओम्या गायकवाड या तरुणाला लक्ष्य करत त्याच्यावर थेट गोळी झाडली. मात्र, सुदैवाने गोळी चुकल्याने ओम्या गायकवाड हा बालंबाल बचावला. या दोन्ही प्रकरणांत खडक पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांची जलद कारवाई; 5 जणांना अटक

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन खडक पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली आणि मुख्य आरोपी सुजल परदेशी याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्या इतर 4 साथीदारांनाही अटक करण्यात आली.

(नक्की वाचा-  IAS Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या भीतीने जिलबीने बदलला रंग; नेमकं काय घडलंय?)

अटक करण्यात आलेले आरोपी

  • सुजल उर्फ चिम्या सुनील परदेशी 
  • जय उर्फ पियुष अनिल परदेशी
  • सोनू उर्फ मॉन्टी अनिल परदेशी
  • विकी राजू परदेशी 
  • नितेश उर्फ बॉबी संतोष रिकीबे 
     
संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com