Pune Traffic : गणेश मिरवणुकीसाठी पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल; प्रमुख 17 रस्ते राहणार बंद 

गणेश विसर्जनादरम्यान पुण्यात वाढणारी गर्दी लक्षात घेता पुण्यातील मध्यभागातील प्रमुख 17 रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

Advertisement
Read Time: 1 min
पुणे:

गणेश विसर्जनादरम्यान (Pune Ganesh Miravnuk) पुण्यात वाढणारी गर्दी लक्षात घेता पुण्यातील मध्यभागातील प्रमुख 17 रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीनिमित्त पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत (Pune Traffic) बदल करण्यात येणार आहेत. गणेश मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी खुले करून देण्यात येणार आहेत. विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास होणार आहे.

गणेश विसर्जनाला मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर येत असतात. त्यामुळे वाहतुकीच्या समस्या उद्भवू नये यासाठी काही रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मिरवणूक सुरू होण्यापूर्वी मध्यभागातील लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, केळकर रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, गणेश रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता, भांडारकर रस्ता, पुणे-सातारा रस्ता, सोलापूर रस्ता, प्रभात रस्ता, बगाडे रस्ता, गुरू नानक या रस्त्यांवरील वाहतूक विसर्जन मिरवणुकीची सांगता होईपर्यंत बंद राहणार आहे.